एकनाथ शिंदेंना धक्का;  १५ माजी नगरसेवक ठाकरे गटात परतणार
एकनाथ शिंदेंना धक्का; १५ माजी नगरसेवक ठाकरे गटात परतणार
img
वैष्णवी सांगळे
आगामी स्वराज संस्थेच्या निवडणुका तोंडावर आहेत. दरम्यान राज्यात मात्र मोठ्या राजकीय हालचाली घडत आहेत. एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंची ताकद वाढणार आहे. त्यातच उद्धव ठाकरेंची ताकद आणखी एका गोष्टीने वाढणार आहे. शिंदे गटातील माजी नगरसेवक परत ठाकरे गटात जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. त्यामुळे उद्धव ठाकरेंची ताकद पुन्हा आणखी वाढणार आहे. 



'क्रिकेटपटूंची देशभक्ती कुठे गेली?' वीर पत्नीचा सवाल ; सामना पाहण्यासाठी टीव्ही देखील चालू करु नका...

मुंबईतील १५ माजी नगरसेवक पुन्हा ठाकरेंकडे जाण्याच्या तयारीत असून माजी नगरसेवकांकडून ठाकरेंना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता, असे १५ माजी नगरसेवक पु्न्हा ठाकरे गटात जाणार आहेत. दरम्यान आज ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत या माजी नगरसेवकांना पक्षात घ्यायच की नाही याबद्दल भूमिका घ्यायला हवी आमदार खासदार म्हणालेत.


इतर बातम्या
Join Whatsapp Group