बॉक्सर मेरी कोमच्या घरी चोरी, परिसरात खळबळ
बॉक्सर मेरी कोमच्या घरी चोरी, परिसरात खळबळ
img
दैनिक भ्रमर
बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियन एमसी मेरी कोम सध्या मेघालयात अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सहभाग घेत असल्यामुळे ती बाहेर आहे. दरम्यान तिच्या फरीदाबादमधील सेक्टर ४६ येथील घरात चोरी झाली. एनआयटी गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करत चोरीमध्ये सहभागी असलेल्या तीन अल्पवयीन मुलांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी माहिती देणाऱ्याच्या मदतीने आणि सीसीटीव्ही कॅमेरा पाहून लेझर व्हॅली पार्कजवळ तिघांना पकडले. २३-२४ सप्टेंबरच्या मध्यरात्री रिकाम्या घरांचा शोध घेत ते फिरत होते आणि त्यावेळी मेरी कोमच्या घरात शिरले. घरात प्रवेश करून त्यांनी तीन एलईडी टीव्ही, मनगटी घड्याळ, चष्मा, ब्रीफकेस, बूट, कपडे, सँडल, परफ्यूम, ट्रिमर, लॅपटॉप चार्जर आणि बेल्ट यासारख्या वस्तू चोरल्या. पोलीस चौकशीनंतर चोरीस गेलेल्या वस्तू ताब्यात घेण्यात आल्या.

या चोरीचा उलगडा सीसीटीव्हीच्या मदतीने झाला. शनिवारी मेरी कोमच्या शेजाऱ्यांनी त्यांच्या घराबाहेरील कॅमेऱ्यात संशयास्पद हालचाली पाहिल्या. त्यानंतर त्यांनी मेरी कोमला माहिती दिली. मेरी कोम दिल्लीतील आपल्या प्रशिक्षक शांती कुमार लेखुराम यांच्या माध्यमातून पोलिसांकडे तक्रार नोंदवली. तक्रार आल्यानंतर पोलिस आयुक्त सतेंद्र कुमार गुप्ता यांनी हा तपास गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवला. पोलीस प्रवक्ते यशपाल यांनी सांगितले की अल्पवयीन मुलांचे उर्वरित साथीदार लवकरच अटकेत घेतले जातील.
इतर बातम्या
Join Whatsapp Group