ड्रग्स केसमध्ये अडकला 'हा' अभिनेता, नाव समोर
ड्रग्स केसमध्ये अडकला 'हा' अभिनेता, नाव समोर
img
दैनिक भ्रमर
बॉलिवूडमधून एक मोठी आणि खळबळजनक बातमी मंगळवारी समोर आली होती. एका बॉलिवूड सहाय्यक अभिनेत्याला ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. चेन्नई कस्टम्स आणि महसूल गुप्तचर संचालनालयाने संयुक्तपणे ही कारवाई केली होती. आता अखेर या सहाय्यक अभिनेत्याचे नाव समोर आले आहे.


विशाल ब्रह्मा या सहाय्यक अभिनेत्याला 40 कोटी रुपयांच्या ड्रग्जची तस्करी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आले. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने त्याला चेन्नई विमानतळावर अटक केली. त्याच्याकडून ४० कोटी रुपयांचे (सुमारे १.४ अब्ज डॉलर्स) मेथाकॅलोन नावाचे ड्रग्ज जप्त करण्यात आले.

मीडिया रिपोर्टनुसार, विशाल ब्रह्मा सिंगापूरहून परतत होता आणि चेन्नई विमानतळावर उतरताच डीआरआयच्या पथकाने त्याला अटक केली. विशाल एका नायजेरियन टोळीसाठी काम करत होता आणि त्यांच्या संपर्कात होता असा दावा केला जात आहे. विशालला कंबोडियाला मोफत प्रवासाचे आमिष दाखवून आणण्यात आले होते. परंतु त्याला फक्त ड्रग्ज असलेली ट्रॉली बॅग घेऊन परतावे लागले. विशालला पैशांचे आमिष दाखवण्यात आले. विशालला एका नायजेरियन ड्रग्ज सिंडिकेटने अडकवले.

विशाल ब्रह्मा कोण?
विशाल ब्रह्मा मूळचा आसामचा रहिवासी आहे. विशाल ब्रह्माला 'स्टुडंट ऑफ द इयर 2' मुळे खूप लोकप्रियता मिळाली. 'स्टुडंट ऑफ द इयर 2' चित्रपट 2019 ला प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याने टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया यांच्यासोबत काम केले. चित्रपटात त्याने सम्राटची भूमिका साकारली. तो सहाय्यक अभिनेता आहे. त्यानंतर तो 'बिहू अटॅक' चित्रपटात दिसला. आजवर विशालने चित्रपटात छोट्या मोठ्या भूमिका केल्या आहेत. विशाल ब्रह्मा 32 वर्षांचा आहे. अभिनयात येण्यापूर्वी तो मॉडेलिंग करत होता.
इतर बातम्या
Join Whatsapp Group