राज्यात अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने केलेली मदत तुटपुंजी असल्याचं सांगत तसेच मोठ्या नुकसानीमुळे अनेक शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. पावसामुळे संसार उघड्यावर पडले आहे. लाखो हेक्टर पीक अतिवृष्टीमुळे वाया गेलंय. तर नद्यांना आलेल्या महापुरामुळे शेतजमीन वाहून गेल्या आहेत. त्यामुळे शेतात पुढील पीक कसं घ्यायचं असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतोय.
दरम्यान शेतकऱ्यांच्या मदतीसीठी सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकरी कर्जमाफीची घोषणा सरकारनं करावी, अशी मागणी विरोधक आणि शेतकऱ्यांकडून केली जात आहे. अशातच राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी हाती आलीय. दोन दिवसात मुख्यमंत्री शेतकऱ्यांना मदतीची मोठी घोषणा करणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिलीय.
सरकार शेतकरी कर्जमाफीची घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे नुकासान झाल्यानं राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी केली जातेय. त्यामुळे मुख्यमंत्री कदाचित दोन दिवसात ओला दुष्काळ जाहीर करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.