झुबिन गर्ग मृत्यू प्रकरणात आता नवा ट्विस्ट, मॅनेजरने विष दिलं ?
झुबिन गर्ग मृत्यू प्रकरणात आता नवा ट्विस्ट, मॅनेजरने विष दिलं ?
img
वैष्णवी सांगळे
प्रसिद्ध गायक झुबिन गर्गच्या मृत्यूचं कोडं अजूनही सुटलेल नाही. झुबिन गर्ग आसामचा असून भारताच्या नावाजलेल्या गायकांमध्ये त्याचे नाव होते.  १९ सप्टेंबरला नॉर्थईस्ट इंडिया फेस्टिव्हलच्या दरम्यान सिंगापूरच्या लॅझरस आयलंडवर यॉट आऊटिंगदरम्यान त्याचा मृत्यू झाला. आता या रहस्यमय मृत्यूचे प्रकरण एका भयानक वळणावर येऊन पोहोचले आहे. 


तपासादरम्यान जुबिन गर्गच्या जवळच्या व्यक्तीने आणि यॉटवर उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने दावा केला आहे की गायकाला विष देण्यात आले होते. झुबिन गर्गच्या मृत्यूनंतर एसआयटीची स्थापना झाली असली तरी, केसमध्ये रोज धक्कादायक खुलासे होत आहेत. नुकतेच त्याच्या बँडमेटने एसआयटी चौकशीमध्ये केलेल्या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता झुबिन यांचा मृत्यू अपघाताने नाही तर खून असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

झुबिनचा मॅनेजर सिद्धार्थ शर्मा यांना १ ऑक्टोबरला एसआयटीने (विशेष तपास पथक) गुन्हेगारी कट, हत्येच्या आरोपांवर अटक केली आहे. ही कारवाई साक्षीदाराच्या विधानानंतर झाली, ज्यात आरोप आहे की गायकाला ‘विष देण्यात आलं’ होतं. झुबिन गर्गच्या जवळच्या व्यक्ती आणि बँडमेट शेखर ज्योती गोस्वामी यांनी एसआयटीला दिलेल्या विधानात आरोप केला आहे की मॅनेजर सिद्धार्थ शर्मा आणि फेस्टिव्हल आयोजक श्यामकानू महंत यांनी गायकाला विष दिलं होतं आणि आपल्या कट यशस्वी करण्यासाठी जाणीवपूर्वक एका विदेशी ठिकाणाची निवड केली. 

५२ वर्षीय झुबिन गर्गचा १९ सप्टेंबरला नॉर्थईस्ट इंडिया फेस्टिव्हलच्या चौथ्या आवृत्तीदरम्यान सिंगापूरच्या लॅझरस आयलंडवर यॉट आऊटिंगदरम्यान मृत्यू झाला. सुरुवातीच्या अहवालांमध्ये बुडणं असं सांगितलं गेलं. साक्षीदाराचा दावा आहे की झुबिन हे उत्कृष्ट पोहणारे होते आणि त्यांनी स्वतः शर्मा यांना ट्रेनिंग दिली होती. अशा परिस्थितीत अपघाताने बुडणं जवळपास अशक्य आहे.

झुबिनच्या शेवटच्या क्षणांत जेव्हा ते श्वास घेण्यासाठी झगडत होते आणि तोंड-नाकातून फेस निघत होता, तेव्हा सिद्धार्थ शर्मा यांनी याला ‘एसिड रिफ्लक्स’ म्हणून टाळून दिलं. कथितरित्या ओरडले ‘जाऊ द्या, जाऊ द्या’ (त्याला जाऊ द्या, जाऊ द्या). एसआयटीच्या रिमांड नोटमध्ये झुबिनच्या को-सिंगर अमृत प्रभा महंता आणि अभिनेत्री निशिता गोस्वामी यांच्या विधानांचाही उल्लेख आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group