माजी मुख्यमंत्र्यांना झटका, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
माजी मुख्यमंत्र्यांना झटका, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
img
वैष्णवी सांगळे
बिहारमध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. अशातच बिहारमध्ये राजकीय उलथापालथ पहायला मिळत आहे. निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. जेडीयू-राजद अशा पक्षांमधून इनकमिंग आणि आउटगोईंग सुरु आहे. अशातच राजद म्हणजेच राष्ट्रीय जनता दलाचे आमदार चेतन आनंद यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.


शिवहारचे आमदार चेतन आनंद यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी विधानसभा अध्यक्षांना राजीनामा पत्र पाठवले आहे. राष्ट्रीय जनता दलातून बाहेर पडत ते जेडीयू म्हणजे जनता दल युनायटेडकडून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या राजीनाम्यामुळे राजदला आणि माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना धक्का बसल्याचे मानले जात आहे.

चेतन आनंद यांचा जेडीयूमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. राजदने त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यासाठी अर्ज दिला होता, पण त्यावर काहीही कारवाई झाली नाही. आता विधानसभा निवडणुका जवळ आल्याने त्यांनी स्वत:हून सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आता आता जेडीयूच्या तिकिटावर शिवहार मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार आहे, असे त्यांनी सांगितले. शिवहारमधून तिकीट निश्चित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
rjd | jdu |
इतर बातम्या
Join Whatsapp Group