माझ्यावर काळी जादू केली होती; अमृता रावचा खळबळजनक दावा
माझ्यावर काळी जादू केली होती; अमृता रावचा खळबळजनक दावा
img
वैष्णवी सांगळे
‘विवाह’, ‘मैं हूं ना’ यासारख्या मोठ्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री अमृता राव हिने खळबळजनक दावा केला आहे.  एका पॉडकास्टमध्ये तिने सांगितले की, तिच्यावर काळी जादू करण्यात आली होती. पूर्वी ती अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हती. पण जेव्हा तिच्यासोबत असे घडले, तेव्हा ती चकित झाली.  


अमृताने तिची कहाणी सांगताना म्हटले की, एकदा ती तिच्या गुरुजींना भेटली होती. त्यांनी तिला आशीर्वाद दिला. त्यानंतर 1-2 दिवसांनी त्यांनी माझ्या आईशी बोलताना सांगितले की, कोणीतरी तुझ्या मुलीवर वशीकरण केले आहे. हे ऐकून मी थक्क झाले. जर ही गोष्ट गुरुजींव्यतिरिक्त कोणी सांगितली असती, तर मी वशीकरणासारख्या गोष्टींवर कधीच विश्वास ठेवला नसता.

ती पुढे म्हणाली, “मला माहिती आहे की, ते (गुरुजी) खरे आहेत. त्यांना काही गमावण्याची भीती नाही, किंवा काही मिळवण्याची इच्छाही नाही. त्यांनी मला फक्त सत्य सांगितले. त्यांच्या बोलण्यानंतर मला वाटले की, कदाचित माझ्यावर काळा जादू झाली असावी. याआधी मी फक्त इतर अभिनेत्रींकडून ऐकले होते की, इंडस्ट्रीत काळी जादू होते.” अमृताने सांगितले की, तिला काळी जादू जाणवली नव्हती, पण कदाचित काही नकारात्मक गोष्टी तिच्यासोबत घडल्या होत्या.

अमृताने एक किस्सा सांगताना म्हटले, “माझ्या आयुष्यात एक वळण असे आले जेव्हा मी 3 मोठे चित्रपट साइन केले होते. ते सर्व चित्रपट मोठ्या बॅनरचे होते. त्या वर्षी सर्वात मजेदार गोष्ट घडली, ती म्हणजे ते तिन्ही चित्रपट बनलेच नाहीत. मी साइनिंग रक्कमही घेतली होती, पण प्रोजेक्ट बंद पडले. माझ्यासाठी हे थोडे विचित्र होते.”


इतर बातम्या
Join Whatsapp Group