'राईज अँड फॉल' शोच्या पहिल्या सीझनचा विजेता जाहीर , जाणून घ्या कोण आहे विजेता
'राईज अँड फॉल' शोच्या पहिल्या सीझनचा विजेता जाहीर , जाणून घ्या कोण आहे विजेता
img
वैष्णवी सांगळे
 "राईज अँड फॉल" या शो गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. स्पर्धकांनी केलेल्या खळबळजनक आणि तीक्ष्ण विधानांमुळे हा शो चर्चेत आला. धनश्री वर्मा हिने युजवेंद्रबाबत केलेल्या विधानामुळे हा शो चांगलाच चर्च आला होता. शोचा हा पहिलाच सिझन होता त्यामुळे पहिला विजेता कोण ठरणार याकडे अनेकांच्या नजर लागल्या होत्या. 


पहिल्या सीझनमध्ये अर्जुन बिजलानी विजयी झाला आहे. त्याने सहा फायनलिस्टमध्ये झालेल्या स्पर्धेतून ट्रॉफी जिंकली. आरुष भोला हा पहिला रनर-अप होता, तर अरबाज पटेल दुसरा रनर-अप होता. रिअॅलिटी शोची सुरुवात १५ स्पर्धकांनी झाली. अर्जुन बिजलानी, आरुष भोला आणि अरबाज पटेल हे तीन फायनलिस्ट म्हणून निवडले गेले. यापैकी अर्जुन बिजलानी पहिल्या सीझनचा विजेता ठरला. अर्जुनला ट्रॉफी आणि २८,१,००० लाख रुपये रोख बक्षीस मिळाले.

शो जिंकल्यानंतर अर्जुन बिजलानीने पापाराझींना सांगितले, "तुम्हाला माहिती आहे, मला घरी जायचे आहे, माझ्या बेडवर झोपायचे आहे आणि माझ्या मुलाला मिठी मारायची आहे." या दरम्यान, अर्जुन त्याच्या पत्नीसोबत दिसला. अभिनेता म्हणाला, "आम्ही एकत्र आल्यानंतर पहिल्यांदाच मी त्याचा वाढदिवसाला नव्हतो. पण तिच्यासाठी यापेक्षा चांगली भेट काय असू शकते?"
इतर बातम्या
Join Whatsapp Group