शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला
शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला
img
वैष्णवी सांगळे
कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर मध्यरात्री हल्ला करण्यात आला आहे. शिवसेना कार्यालयासमोर भांडण सोडवून जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेत असताना अज्ञात व्यक्तींकडून हल्ला केल्याचे समोर आले आहे.  भयानक हल्ल्यात बोरगावकर आणि आणखी दोघे, असे तीन जण जखमी झाले आहेत. 


प्राथमिक माहितीनुसार, उमेश बोरगावकरांनी एका हाणामारीत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी ओंकार नामक एका तरुणाला डोक्याला मार लागून रक्त आले होते. या घटनेनंतर ओंकारला उपचारांसाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले होते.

उपचार आणि तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करून बोरगावकर आणि त्यांचे सहकारी रुग्णालयातून बाहेर पडत असताना त्यांच्या गाडीवर चारी बाजूंनी हल्ला करण्यात आला. मुलांच्या घोळक्याने त्यांची गाडी तोडली आणि बोरगावकरांवरही हल्ला केला. 

या हल्ल्यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला असून पुढील तपास करत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात या घटनेने खळबळ उडाली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group