महिला डाॅक्टर मृत्यू प्रकरण; चौकशीत धक्कादायक माहिती समोर, डॉक्टर तरुणीच्या मृत्यूच्या काही मिनिटे अगोदरच...
महिला डाॅक्टर मृत्यू प्रकरण; चौकशीत धक्कादायक माहिती समोर, डॉक्टर तरुणीच्या मृत्यूच्या काही मिनिटे अगोदरच...
img
वैष्णवी सांगळे
फलटण येथील वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या संपदा मुंडे यांनी तळहातावर एक नोट लिहित थेट आत्महत्या केली. पीएसआय गोपाळ बदने यांनी चार वेळा बलात्कार केला तर प्रशांत बनकर याने शारिरीक आणि मानसिक त्रास दिल्याचे नोटमध्ये संपदा मुंडे यांनी लिहिले. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर गंभीर आरोप केली जात आहेत. या प्रकरणात एसआयटीची स्थापना करावी, अशी थेट मागणी डॉक्टर तरूणीच्या कुटुंबियांनी केली. 


या प्रकरणात एका खासदाराचे नाव आल्याने राजकीय वळण संपूर्ण प्रकरणाला लागलंय. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर आरोपी पीएसआय फरार झाला होता. पोलिस दलातून बडतर्फ करण्याच्या इशाऱ्यानंतर तो पोलिसांना शरणागती आला. आता या प्रकरणातील अतिशय धक्कादायक अशी माहिती पुढे येतंय.

दरम्यान, पोलिस स्टेशनला स्वत:हून हजर झाल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. यावेळी बदने रडल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी शरण आल्यानंतर न्यायालयात हजर करण्यापूर्वी मध्यरात्रीपर्यंत चौकशी केली होती. तत्पूर्वी, त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेल्यानंतर आपला पोलिसांवर विश्वास असल्याचे त्याने म्हटले होते.

 दुसरीकडे, युवतीच्या सुसाईड नोटवरून घरमालकाचा मुलगा प्रशांत आणि बदनेला अटक केली असली तरी महिलेत नोकरीत सुद्धा रिपोर्ट बदलून देण्यासाठी राजकारण्यांचा आणि पोलिसांचा दबाव होता, असेही तिच्या व्हायरल झालेल्या पत्रांवरून समोर आलं आहे. यामध्ये खासदार आणि त्यांच्या दोन पीएचा सुद्धा उल्लेख आहे. 

संपदा मुंडे प्रकरणातील मुख्य आरोपी पीएसआय गोपाळ बदने आणि दुसरा आरोपी प्रशांत बनकर संपर्कात होते. यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या काही वेळ अगोदरच दोघांमध्ये संवाद देखील झाला होता. डॉक्टर महिलेनी आत्महत्या करण्यापूर्वी प्रशांत बनकर आणि पीएसआय गोपाळ बदने या दोघांशी व्हाट्सअप कॉलवर संवाद झाला होता. नॉर्मल फोन करण्याऐवजी दोघांनी व्हाट्सअप कॉलवर एकमेकांसोबत संवाद साधला होता.

संपदा मुंडे हिच्या आत्महत्येच्या काही मिनिटे अगोदरच दोन्ही आरोपींमध्ये व्हाट्सअप कॉल झाल्याने संशय अधिकच वाढला आहे. संपदा मुंडेसोबत नेमके काय संबंध होते, हे सांगणे टाळताना पीएसआय बदने दिसतोय. हातावर लिहिलेली सुसाईड नोटमध्ये संपदा मुंडेचे हस्ताक्षर आहे का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

दरम्यान , निलंबित पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदनेला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी बदनेच्या शोधासाठी पथके स्थापन केली होती. मात्र, स्वतः हून शनिवारी रात्री फलटण ग्रामीण पोलिसांसमोर शरण आला. पोलिसांनी शरण येताच रात्री दीड वाजेपर्यंत त्याची कसून चौकशी करत रविवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group