तयारीला लागा ! पोलीस दलात १५, ६३१ पदांची मेगाभरती, कोणत्या पदासाठी किती जागा ? वाचा
तयारीला लागा ! पोलीस दलात १५, ६३१ पदांची मेगाभरती, कोणत्या पदासाठी किती जागा ? वाचा
img
वैष्णवी सांगळे
पोलीस दलात काम करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्याच्या गृह विभागाने अखेर 15 हजार 631 पोलिस शिपायांच्या मेगा पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे. उमेदवारांना उद्यापासून, म्हणजेच 29 ऑक्टोबर 2025 पासून अर्ज भरता येणार आहेत. या भरतीमुळे राज्यात तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. 


मुख्य म्हणजे एका पदासाठी उमेदवारास एकाच जिल्ह्यात एकमेव अर्ज करता येणार आहे. जर उमेदवाराने एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांत अर्ज केल्यास, ते अर्ज बाद ठरवले जातील. 

राज्यातील पोलिसांची रिक्तपदे
पोलिस शिपाई : 12,399
सशस्त्र पोलिस शिपाई :2,393
चालक शिपाई : 234
कारागृह शिपाई : 580
बॅण्डसमन : 25
एकूण : 15,631 

भरतीचे वेळापत्रक आणि अंतिम मुदत
राज्याच्या मंत्रिमंडळाने ऑगस्ट महिन्यात या भरतीला मान्यता दिली होती, मात्र अर्ज प्रक्रिया सुरू झाली नव्हती. आता, 29 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. यामध्ये पोलिस शिपाई, चालक शिपाई , बॅण्डसमन , सशस्त्र पोलिस शिपाई  आणि कारागृह शिपाई , अशी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 या काळात रिक्त होणारी पदे भरली जाणार आहेत.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group