केजीएस शुगर कारखान्यातून ऊस उत्पादकांना दिलासा, बंद काळातील थकीत पेमेंटचे वाटप
केजीएस शुगर कारखान्यातून ऊस उत्पादकांना दिलासा, बंद काळातील थकीत पेमेंटचे वाटप
img
वैष्णवी सांगळे
लासलगाव  – दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या ऊस बिलांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. केजीएस शुगर कारखान्याने बंद काळातील थकीत ऊस पेमेंटचे वितरण करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. गुरुवारी (दि. 30 ऑक्टोबर) कारखान्याच्या कार्यस्थळावर झालेल्या कार्यक्रमात संचालिका सौ. सोनिया  होळकर आणि संचालक प्रकाश  दायमा यांच्या हस्ते एकूण २३६ ऊस उत्पादकांना तब्बल ₹१ कोटी ६८ लाखांचे पेमेंट धनादेशाद्वारे वाटप करण्यात आले. या निर्णयामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.



लासलगावचे उद्योगपती  संजय होळकर यांनी केजीएस शुगर कारखाना एनसीएलटीमार्फत विकत घेतल्यानंतर पहिल्याच टप्प्यात थकीत ऊस पेमेंटची तरतूद करून शेतकऱ्यांमध्ये विश्वासाची नवी भावना निर्माण केली आहे.

चालू हंगामातील ऊस गळीतासाठी केजीएस शुगर कारखान्यात जास्तीत जास्त ऊस पाठवावा. तसेच लागवड हंगाम 2025-26 साठी अधिकाधिक ऊस लागवड करून कारखान्याच्या विकासात सहभागी व्हावे. दरम्यान, कारखान्याचे रिपेअरिंग कामही जलदगतीने सुरू असून लवकरच गळीत हंगामाला सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांना ऊस नोंदणी लवकर करण्याचे आवाहन केले आहे.
सोनिया होळकर,संचालक केजीएस
साखर कारखाना
kgs |
इतर बातम्या
Join Whatsapp Group