सर्वोच्च न्यायालयाने आज पिंटू शिर्के हत्या प्रकरणात राजू भद्रे याला निर्दोष ठरवत सर्व आरोपांतून मुक्त केले आहे. हे निर्णय रीव्ह्यू पिटिशनवरील सुनावणीत देण्यात आले.
नागपुरातील गाजलेल्या पिंटू शिर्के हत्याकांड प्रकरणात कुख्यात गुन्हेगार राजू भद्रे याची सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (दि.३) निर्दोष मुक्तता केली आहे. पुनर्विचार याचिकेवर हा निर्णय देण्यात आला. या निकालानंतर जनमानसात तर्कवितर्क लावले जात आहेत.
राजू भद्रे यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा, वकील प्रफुल मोहगावकर आणि वकील शुभंकर डाबले यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने सादर करण्यात आलेल्या पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांचा सखोल अभ्यास करून भद्रे यांना निर्दोष घोषित केले.