उद्योगजगताला मोठा धक्का ! गोपीचंद हिंदुजा यांचं निधन
उद्योगजगताला मोठा धक्का ! गोपीचंद हिंदुजा यांचं निधन
img
वैष्णवी सांगळे
उद्योगजगतातुन एक दुःखद घटना समोर आली आहे. हिंदुजा ग्रुपचे चेअरमन गोपीचंद पी हिंदुजा यांचं निधन झालं आहे. ते ८५ वर्षांचे होते. लंडनच्या एका रूग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गोपीचंद यांनी जवळपास ६ दशकं त्यांचा कौटुंबिक व्यवसाय ग्लोबल पातळीवर नेण्यासाठी महत्त्वाची भूमिका साकारली. गोपीचंद यांचं निधन हे हिंदूजा समूहासाठी एका युगाचा अंत मानला जातोय. 



२९ जानेवारी १९४० साली त्यांचा जन्म झाला होता. गोपीचंद हिंदुजा यांचा जन्म सिंधी व्यापारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबामध्ये झाला. त्यांनी मुंबईतील जे हिंद कॉलेजमधून शिक्षण घेतलं होतं. सुरुवातीपासूनच कुटुंबाच्या व्यवसायात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे हिंदुजा ग्रुपने ट्रेडिंग-केंद्रित व्यवसायातून बाहेर पडत ऑटोमोबाईल, ऊर्जा, मीडिया, बँकिंग आणि स्टीलसारख्या विविध क्षेत्रांत विस्तार केला.

गोपीचंद हिंदुजा यांनी आपल्या मोठ्या भावासोबत म्हणजेच श्रीचंद हिंदुजा यांच्यासोबत मिळून ग्रुपला नव्या उंचीवर नेलं. 1984 मध्ये Gulf Oil International आणि 1987 मध्ये भारतातील प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी अशोक लेलँडचे अधिग्रहण हे त्यांच्या नेतृत्वाखाली झालं. या निर्णयांनी हिंदुजा ग्रुपला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group