एनआयएची मोठी कारवाई : दहशतवादी कट रचला जात असल्याचा संशय
एनआयएची मोठी कारवाई : दहशतवादी कट रचला जात असल्याचा संशय
img
Dipali Ghadwaje
नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने आज बुधवारी दहशतवादी कट रचत असल्याप्रकरणी बेंगळुरूमध्ये ६ पेक्षा अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. एनआयएच्या अनेक पथकांनी विशिष्ट माहितीच्या आधारे राज्य पोलीस दलाच्या समन्वयाने बेंगळुरूमधील विविध ठिकाणी छापे टाकत कारवाई केली आहे. 

NIA ने ISIS वर मोठ्या प्रमाणात कारवाई करत 9 डिसेंबर रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटकात अनेक ठिकाणी छापे मारून प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या 15 कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर काही दिवसांतच ही मोठी कारवाई केली आहे. 

दहशतवादी संबंध असलेल्या आणि त्यांच्या विदेशी हस्तकांच्या इशार्‍यावर कार्यरत असलेल्या संशयितांच्या घरांवर छापे टाकण्याचे काम अजूनही सुरू आहे. याशिवाय संशयितांचा विविध दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय सहभाग होता अशी माहिती आहे.

दरम्यान या प्रकरणात, एनआयएच्या पथकांनी महाराष्ट्रातील पडघा-बोरिवली, ठाणे, मीरा रोड, पुणे आणि कर्नाटकातील बेंगळुरू येथे तब्बल 44 ठिकाणी छापे टाकले आणि 15 आरोपींना दहशतवाद आणि दहशतवादाशी संबंधित कृत्ये आणि प्रतिबंधित संघटनेशी संबधित कारवाई करणाऱ्या व्यक्तींना अटक केली आहे. 

इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरियाच्या दहशतवादाशी संबधित प्रयत्न हाणून पाडण्यासाठी एनआयएने मोठ्या प्रमाणावर छापे टाकण्यास सुरूवात केली आहे.

दरम्यान  सुरू असलेल्या या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोकड, बंदुक, धारदार शस्त्रे, गुन्हेगारी दस्तऐवज, स्मार्टफोन आणि इतर डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. या सर्वांचा वापर दहशतवादी हिंसक कारवायांसाठी केला जातो. 

NIA च्या तपासात पुढे असे समोर आले आहे की, आरोपी, ISIS महाराष्ट्र मॉड्यूलचे सर्व सदस्य, पडघा-बोरिवली येथून कार्यरत होते, जिथे त्यांनी संपूर्ण भारतात दहशत पसरवण्याचा आणि हिंसाचार घडवून आणण्याचा कट रचला होता. हिंसक जिहाद, खिलाफत आणि ISIS च्या मार्गाचा अवलंब करून आरोपींनी देशाची शांतता आणि सांप्रदायिक सलोखा बिघडवणे आणि भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले होते.


अटक करण्यात आलेल्या आरोपींनी ठाण्यातील पडघा हे गाव 'लिबरेटेड झोन' आणि 'अल-शाम' म्हणून घोषित केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ते प्रभावशाली मुस्लिम तरुणांना पडघा तळ मजबूत करण्यासाठी त्यांच्या राहत्या ठिकाणाहून पडघा येथे स्थलांतरित होण्यास प्रवृत्त करत होते.

साकिब नाचन, मुख्य आरोपी आणि ISIS मॉड्यूलचा नेता आणि प्रमुख देखील प्रतिबंधित संघटनेत सामील झालेल्या व्यक्तींना 'बायथ' (आयएसआयएसच्या खलिफाशी निष्ठेची शपथ) देत होता.

ISIS ही एक ग्लोबल टेरर ऑर्गनायझेशन (GTG) आहे, ज्याला इस्लामिक स्टेट (IS), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट (ISIL), Daish, इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रांत (ISKP), ISIS विलायत खोरासान, इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड शाम म्हणून ओळखले जाते. देशातील विविध राज्यांमध्ये स्थानिकीकृत ISIS मॉड्यूल आणि सेल तयार करून ही संघटना भारतात आपले दहशतवादी नेटवर्क पसरवत आहे.

NIA ने अलिकडच्या काही महिन्यांत दहशतवादी संबधित ठिकाणांवर मोठ्या प्रमाणावर छापे टाकले आहेत आणि ISIS च्या दहशतवादी कट प्रकरणात अनेक दहशतवादी कार्यकर्त्यांना अटक करून वेगवेगळ्या ISIS मॉड्यूल्सचा पर्दाफाश केला आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group