लासलगाव. पिंपळगाव नजीकच्या दोन मंदिरातील चोरीचा अद्याप तपास लागलेला नसतानाच येथून दहा किलोमीटर अंतरावरील शिवापूर (शेळकेवाडी) येथील श्री. महालक्ष्मीमाता मंदिरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून महालक्ष्मी मंदिरातील ५८ हजार रुपयांची चोरी झाल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.
लासलगाव पोलीस कार्यालयात दिनकर जगताप यांनी फिर्याद दिली असून गावातील महिला राही पवार या दर्शनासाठी गेल्या असता श्री. महालक्ष्मीमाता मंदिरात दरवाजाचे कडी-कोंयडा तुटलेले दिसले. यावेळी त्यांना दानपेटीचे तसेच श्री. महालक्ष्मीमाता मंदिरात चिटकवलेल्या चांदीच्या पादुका दिसल्या नाहीत.
प्रथमदर्शनी ४५ हजार रुपयांच्या अंदाजे अर्धा किलो वजनाच्या चांदीच्या पादुका, ८ हजाांची पितळी समई, ५ हजार रोख रुपये असा एकूण ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांने मंदीराचा दरवाजा तोडुन चोरी करुन नेल्याची फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ नाईकवाडे अधिक तपास करीत आहेत.