सातपूरच्या जिजामाता कॉलनी परिसरात बिबट्या पिंजर्‍यात जेरबंद
सातपूरच्या जिजामाता कॉलनी परिसरात बिबट्या पिंजर्‍यात जेरबंद
img
दैनिक भ्रमर



सातपूर -प्रभाग क्रमांक नऊ मधील छत्रपती शिवाजीनगर येथील जिजामाता कॉलनी परिसरात लावण्यात आलेल्या पिंजर्‍यात अखेर बिबट्या जेरबंद झाला.

दोन दिवसांपूर्वी या परिसरात काही नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेची माहिती मिळताच युवा  ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक अमोल पाटील यांनी तत्काळ वनविभागाचे सुमित निर्मळयांच्याशी  संपर्क साधून परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली होती. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्या असलेल्या परिसराची  पाहणी  करत पिंजरा लावण्यात आला होता. अखेर बुधवारी रात्री साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास बिबट्या त्या पिंजर्‍यात अडकला.

वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मोहिमेनंतर बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्याची दर्शन झाल्याने  नागरिकांना रात्री बाहेर पडण्यास भीती वाटत होती.

या घटनेमुळे सातपूर परिसरात वनविभागाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. दरम्यान, बिबट्याला वैद्यकीय तपासणीनंतर जंगलात सुरक्षितस्थळी सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group