धक्कादायक ! 'या'  जिल्ह्यात आढळली HIV संक्रमित ४०० शालेय मुलं
धक्कादायक ! 'या' जिल्ह्यात आढळली HIV संक्रमित ४०० शालेय मुलं
img
वैष्णवी सांगळे
भारतात एचआयव्ही संक्रमण थांबवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात असतानाच एका जिल्ह्यातील एचआयव्ही रुग्णाच्या संख्येने प्रत्येकाचीच झोप उडवली आहे. बिहारमधील सीतामढी जिल्ह्यात ७,४०० एचआयव्ही रुग्ण आढळले असून, यात ४०० शाळकरी मुलांचाही समावेश आहे. 

सीतामढी येथील एआरटी सेंटर आता राज्यात 'हायलोड सेंटर' म्हणून ओळखले जात आहे, जिथे एचआयव्ही रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.दरमहिन्याला 40 ते 60 नवे रुग्ण आढळत असल्याने आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, असे असले तरी, एड्सग्रस्त रुग्णांच्या एकूण संख्येसंदर्भात अद्यापही संभ्रमाचे वातावरण आहे.

सध्या एआरटी सेंटरमधून दर महिन्याला 5,000 रुग्णांना जीवनरक्षक औषधे दिली जात आहेत. उर्वरित रुग्ण उपचारांसाठी इतर राज्यांमध्ये जात आहेत. या गंभीर परिस्थितीचे एक प्रमुख कारण लोकांमध्ये एचआयव्ही/एड्सबद्दल असलेल्या जागरूकतेची कमतरता आहे. 

ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांमध्ये लोकांना या आजाराच्या प्रसाराचे मार्ग, प्रतिबंध आणि उपचारांबद्दल पुरेशी माहिती नाही. या माहितीच्या अभावामुळे लोक स्वतः संक्रमित होत आहेत आणि नकळतपणे इतरांनाही संसर्ग पसरवत आहेत. आरोग्य विभाग वेळोवेळी जनजागृती मोहिम राबवत असले तरी, रुग्णांच्या संख्येत फारशी घट दिसून येत नाही.
hiv |
इतर बातम्या
Join Whatsapp Group