दगडातून इतिहास घडवणारे हात कायमचे विसावले; महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
दगडातून इतिहास घडवणारे हात कायमचे विसावले; महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
img
वैष्णवी सांगळे
भारतातील नामवंत आणि जगविख्यात शिल्पकार राम सुतार यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी निधन झाले. नोएडा येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा त्यांनी उभारला होता.  राम सुतार यांनी स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा दुप्पट उंच असणारा सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा भव्य पुतळा उभारला.

राम सुतार यांनी जगभर 200 हून अधिक शिल्प बनवली आहेत. दिल्लीत संसद भवनाच्या प्रांगणात राम सुतारांनी साकारलेली शिल्प आहेत. राम सुतार यांना पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण सारख्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः रुग्णालयात त्यांची भेट घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला होता. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र अभिमान गीत देखील गायले होते. 

काही दिवसांपूर्वी अंदमान येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं, तो पुतळा देखील राम सुतार यांनी साकारला होता. राम सुतार यांच्या पुतळ्यामधली कलाकुसर, त्यांच्या शिल्पामधली बारकाई हे त्यांच्या कलेचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या जाण्याने कला क्षेत्राचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group