सुप्रसिद्ध कॉमेडीयन भारती सिंह आणि लेखक-निर्माता हर्ष लिंबाचिया यांनी शुक्रवारी, 19 डिसेंबर रोजी त्यांच्या दुसऱ्या बाळाचं स्वागत केलं. मीडिया रिपोर्टनुसार, भारती शूटमध्ये असतानाच तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या, त्यामुळे तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. भारती सिंहनं गोंडस मुलाला जन्म दिल्याची माहिती मिळतेय. या जोडप्यावर सोशल मीडियातून आता शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
भारती सिंहने काही दिवसांपूर्वी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मनोरंजनसृष्टीतील अनेकांनी हजेरी लावली होती. भारतीने सोशल मीडियावरही या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ शेअर केला होता. भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरात नव्या पाहुण्याचे आगमन झाल्यानंतर त्यांचे मित्रमंडळी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
भारती सिंहने दुसऱ्यांदा गरोदर झाल्याची बातमी स्विट्जरलँडमधून ही माहिती दिली होती. भारती सिंहने गरोदर असल्याचं जाहीर केल्यानंतर तिच्या बाळाची चाहतेही वाट पाहत होते. तिने एका व्लॉगमध्ये घरात लक्ष्मी जन्माला यावी, अशी इच्छा व्यक्त केली होती.