भारतापुढे मोठं संकट !  'या' देशाला सोबत घेऊन पाकिस्तान नव्या कटाच्या तयारीत
भारतापुढे मोठं संकट ! 'या' देशाला सोबत घेऊन पाकिस्तान नव्या कटाच्या तयारीत
img
वैष्णवी सांगळे
आपल्या देशाची सुरक्षा अबाधित राहावी यासाठी अनेक देश लष्कराला बळ पुरवत आहेत. इतर देशांसोबत अनेक देश संरक्षणविषयक करार घडवून आणत आहेत. असे असतानाच आता भारताची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. पाकिस्तान एक मोठा सैन्यविषयक करार घडवून आणत असून याचा भारताला भविष्यात फटका बसू शकतो.

प्राथमिक माहितीनुसार, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात एक महत्त्वाचा संरक्षणविषयक करार होणार आहे. त्या दिशेने दोन्ही देश पावलं टाकत आहेत. या संरक्षण कराराअंतर्गत दोन्ही देश एकमेकांना लष्करी पातळीवर सहकार्य करण्यास वेगळी दिशा मिळणार आहे. सध्यातरी दोन्ही देश या करारावर चर्चा करत आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआय आणि लष्करी अधिकारी बांगलादेशच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यानंतर आता या दोन्ही देशांत संरक्षण करार होत असल्याचे समोर आले आहे.

या कराराविषयीचे वृत्त एका खासगी वृत्तसंस्थेने दिले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र्र मंत्रालयातील सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे. या करारासाठी ड्राफ्ट तयार केला जात असून लवकरच त्याला अंतिम स्वरुप मिळणार आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group