काँग्रेसचे एकनिष्ठ माजी मंत्री सुरुपसिंग हिऱ्या नाईक यांचे निधन
काँग्रेसचे एकनिष्ठ माजी मंत्री सुरुपसिंग हिऱ्या नाईक यांचे निधन
img
वैष्णवी सांगळे
गांधी परिवाराचा सच्चा सेवक म्हणून ओळज असणारे काँग्रेसचे माजी मंत्री सुरुपसिंग हिऱ्या नाईक यांचे ८८ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. अनेक दिवसांपासून सुरुपसिंग नाईक यांची प्रकृती बरी नव्हती. 24 डिसेंबर रोजी सकाळी नवापूर शहरातील एका रुग्णालयात त्यांचे 88 व्या वर्षी निधन झाले. स्व. इंदिरा गांधी ते राहुल गांधींपर्यंत सर्व गांधी कुटुंबाचे नाईक परिवाराचे घनिष्ट संबंध आहेत. नाईक काँग्रेसचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जायचे. माजी मंत्री सुरुपसिंग हिऱ्या नाईक यांचा काँग्रेसमध्ये चांगला दबदबा होता. 

माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांचा जन्म 10 सप्टेंबर 1938 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील नवागाव या लहानशा आदिवासी वस्तीत झाला. त्यांनी शिक्षण घेतलं आणि नंतर आपल्या गावी 1962 साली सरपंच म्हणून निवडून आले. त्यानंतर पंचायत समितीत अपक्ष म्हणून निवडून आले. काँग्रेस पक्षात प्रवेश करत संयुक्त असलेला धुळे नंदूरबार काँग्रेसचे ते सदस्य झाले. तेथे केलेल्या कामामुळे ते सरचिटणीस पदापर्यंत पोहचले. 1962 ते 1972 या काळात त्यांनी जे कार्य केले त्याने त्यांच्या पुढील राजकीय कारकीर्दीसाठी पायाभूत भूमिका बजावली.

1972 साली नवापूर विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने ते निवडून आले. मार्च 1977 मध्ये नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे तिकीट मिळवून निवडून आले. त्यानंतर 1980 साली पुन्हा आमदारकी लढवत राज्यात कॅबिनेट मंत्री झाले. त्यानंतर ते नवापूर मतदारसंघात सातत्याने निवडून आले. काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी अनेक खात्यांचे कॅबिनेट मंत्रिपद भूषवले. 2009 साली विधानसभेत डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधू माजी आ. शरद गावित यांचा त्यांनी पराभव केला. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group