आजचे राशिभविष्य 10 जानेवारी 2026 : 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल, पण कोणाला पैसे देणे टाळाच
आजचे राशिभविष्य 10 जानेवारी 2026 : 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल, पण कोणाला पैसे देणे टाळाच
img
वैष्णवी सांगळे
मेष राशी - आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. नशिबाची साथ तुम्हाला भरपूर मिळेल. नोकरीमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सुद्धा फायदाच फायदा होईल. घरात एखादा शुभ कार्यक्रम होणार आहे ज्यात तुम्ही सहभागी व्हाल. आज तुम्ही तुमचा बहुतेक वेळ तुमच्या मुलांसोबत घालवाल. तुम्ही त्यांच्यासोबत मॉलमध्ये खरेदीलाही जाऊ शकता. घरी अचानक नातेवाईक येण्याची शक्यता आहे

वृषभ राशी - आजचा दिवस तुमचा उत्साहाने भरलेला असेल. तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. कामातून तुम्हाला खूप पैसा मिळेल. आज तुमची आर्थिक बाजू मजबूत राहील. आजचा दिवस चांगलाच जाईल. आज तुमचे नशीब चांगले असेल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळू शकते आणि जिथे जायचे आहे तिथे बदली होण्याची शक्यता आहे.

मिथुन राशी - आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगली यश मिळेल. तुमचा पैसा चांगल्या कामांमध्ये खर्च होईल. विद्यार्थी परीक्षांमध्ये चांगली कामगिरी करतील पण तरीही त्यांच्या मनात थोडी भीती असेल. आज विद्यार्थी अभ्यासात चांगली कामगिरी करतील. कोणालाही पैसे उधार देणे टाळा. व्यवसाय आणि पैशांसाठी आजचा दिवस संमिश्र राहील. 

कर्क राशी - आज नशिबाची पूर्ण साथ मिळणार नाही, पण जर तुमचे कोर्ट-कचेरीचे काही मामले असतील तर त्यात तुम्हाला दिलासा मिळू शकतो. तुमच्या मनातील आळस आज संपेल आणि तुम्हाला सर्व बाजूंनी आनंदाच्या बातम्या मिळतील. कामात प्रामाणिकपणे मेहनत करून वरिष्ठांना खूश करू शकलात तर तुम्हाला आर्थिक फायदाही होऊ शकतो. तुमच्या वरिष्ठांशी शक्य तितकी सल्लामसलत केल्यानंतरच आज कोणतेही काम सुरू करा. 

सिंह राशी - आज तुम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घ्याल. या राशीत जन्मलेल्या व्यावसायिकांसाठी हा दिवस शुभ आहे. आज तुमचे आरोग्य बिघडू शकते ज्यामुळे तुमचा पूर्ण दिवस अस्वस्थतेत जाईल. कामामध्ये कोणाची तरी मदत तुम्हाला फायदा मिळवून देईल. तुम्ही तुमच्या कामाच्या योजना तुमच्या मनाप्रमाणे पूर्ण कराल. तुम्हाला मान मिळेल आणि काही नवीन जबाबदाऱ्याही मिळू शकतात. तुम्ही कठीण समस्यांवर तोडगा काढाल.

कन्या राशी - आज तुम्ही कामासाठी नवीन योजना आखायचा प्रयत्न कराल. पण तुम्हाला त्यात यश मिळू शकते. तुमच्या प्रामाणिकपणामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा आणि कुटुंबाचा प्रेम मिळेल.आज तुम्हाला तुमच्या नशिबाची पूर्ण साथ मिळेल. व्यापार-व्यवसायासाठी आजचा दिवस खूप चांगला राहील. आज व्यापारी वर्गाला विशेषतः चांगले फळ मिळतील, ज्यामुळे धनलाभाचे योग बनतील. तुमच्या कामाच्या ठिकाणी काही मोठे बदल होऊ शकतात. 

तुळ राशी - आज तुम्हाला अस्वस्थ वाटेल. तुमचे खराब आरोग्य तुमच्या अस्वस्थतेचे कारण असेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागणार नाही. नोकरी करणाऱ्या लोकांना नोकरीत येणाऱ्या अडचणींमुळे त्रास होईल. व्यापारी वर्गासाठी परिस्थिती थोडी सामान्य राहील. कामाशी संबंधित प्रवास आणि सहकार्य येणाऱ्या महिन्यांमध्ये चांगले परिणाम देईल. तुमच्यापैकी काहीजण महत्त्वाच्या लोकांशी संपर्क साधून अधिक प्रभावी बनतील.

वृश्चिक राशी - तुमचे अडकलेले काम आज पूर्ण होईल. सरकारी कार्यालयात काम करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. व्यवसायासाठी तुम्ही परदेशातही प्रवास करू शकता.आजचा दिवस पैशांच्या बाबतीत खूप महत्त्वाचा राहील. पैशांशी संबंधित मामले चांगले राहतील. आज तुमच्या जुन्या मित्राशी बोलणे होऊ शकते.  तुमचा आत्मविश्वास वाढेल. आर्थिक परिस्थितीही सुधारेल.

धनु राशी - आज अनुभवी लोकांसोबत राहून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. या राशीच्या महिला आज घरी कीर्तनाचे आयोजन देखील करू शकतात. तुमच्या शेजाऱ्यांसोबत मंदिरात दर्शनासाठी जाल.नोकरीमध्ये चांगला धनलाभ होईल, प्रमोशन होण्याची चिन्हे दिसत आहेत, व्यापाऱ्यांसाठी फायद्याची स्थिती आहे.

मकर राशी - आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी सर्वांशी चांगले वागाल. तुमच्या सहकाऱ्यांची मदत तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. तुम्ही चांगला धनलाभ मिळवण्यात यशस्वी व्हाल. कौटुंबिक सुख चांगले मिळेल. आज तुम्ही जे काम हाती घ्याल ते पूर्ण जबाबदारीने करा. आज बरेच लोक तुमची मदत घेऊ शकतात. पण त्यात तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.

कुंभ राशी - या राशीच्या लोकांना व्यवसाय वाढीसाठी नवीन मार्ग सापडतील. आज काळजीपूर्वक वाहन चालवा, अपघात होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराच्या माहेरून चांगली बातमी येऊ शकते.आजचा दिवस कामाच्या क्षेत्रात फायदेशीर ठरेल. तुमचे सर्वांशी वागणे मधुर राहील. व्यवसायात फायदेशीर स्थिती राहील. लोकांना तुमचा आदर मिळेल. नोकरीतही तुमच्या वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. 

मीन राशी - आज तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घ्याल आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबातील लोकांसाठी तुम्ही तुमच्या व्यस्त वेळापत्रकातूनही वेळ काढाल त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवाल. विद्यार्थ्यांना आज परीक्षा इत्यादींमध्ये यश मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून दुर्लक्षाचा सामना करावा लागेल आणि तुमचे सहकारी तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊन तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न करतील.
इतर बातम्या
Join Whatsapp Group