मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या अभिनयासाठी आणि तिच्या सौंदर्यासाठी चांगलीच प्रसिद्ध आहे. तिचे लाखो चाहते आहे.
सोनालीने मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असते. नुकतीच तिने एक पोस्ट शेअर केली आहे, जी पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सोनाली कुलकर्णी आणि तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे.
सोनाली कुलकर्णीचा चुलत भाऊ अनिरुद्धचं निधन झाले आहे. भावाच्या अचानक जाण्याने सोनालीला धक्का बसला आहे. तिने भावासाठी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये तिने भावासोबत घालवलेल्या आठवणींना उजाळा दिला आहे. भावासोबतचे खास फोटो शेअर केले आहे. भावाच्या आठवणीत सोनाली कुलकर्णीने फोटो पोस्ट करून त्याला भावुक कॅप्शन दिलं आहे.
सोनाली कुलकर्णीची पोस्ट
"आमची अनुमा
हे जग सोडून एका चांगल्या ठिकाणी गेलास.
तुझ्या आत्म्याला शांती मिळो.
वेदनारहित नवीन जीवन मिळवा.
तू माझ्या आयुष्यातील सर्वात आध्यात्मिक, निष्पाप, सर्वांची काळजी घेणारा, निरागस व्यक्ती होता.
सर्वांशी जोडलेला, सर्वांवर निस्वार्थ प्रेम करणारा.
सर्व गाणी मनापासून ऐकणारा, तबला वाजवणारा, सोबत कायम हातात चहा असायचा...
माझ्यासोबत राहिल्याबद्दल आणि सर्वांना प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. खूप प्रेम...
ॐ शांति "