सनरायजर्सला मोठा झटका !  पाकिस्तानी खेळाडूवर डाव लावणं पडलं महागात
सनरायजर्सला मोठा झटका ! पाकिस्तानी खेळाडूवर डाव लावणं पडलं महागात
img
वैष्णवी सांगळे
काव्या मारन यांच्या मालकीच्या सनरायजर्स लीड्स या टीमनं द हंड्रेड 2026 च्या ऑक्शनमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा फिरकीपटू अबरार अहमद याला संघात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. द हंड्रेडमध्ये आयपीएलशी संबंधित संघांच्या फ्रँचायजीकडून पाकिस्तानी खेळाडूंवर बोली लावली जाणार नसल्याची चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात तसं घडलेलं नाही. त्यामुळे काव्या मारन आणि सनरायजर्स लीड्सवर सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. 

तसेच आयपीएलमधील काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबाद संघाला आयपीएलमधून काढून टाका, अशी मागणी देखील करण्यात येत आहे. हे सगळं कमी की काय म्हणून आता सनरायजर्स लीडचं सोशल मीडिया अकाऊंट अचानक बंद करण्यात आल्याने सगळेच हैराण झालेत. गुरुवारी द हंड्रेड मेन्स टूर्नामेंटसाठी इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच खेळाडूंचा लिलाव झाला. 

त्यामध्ये सनरायझर्स लीड्सने तब्बल पाकिस्तानी लेग-स्पिनर अबरार अहमदला 1,90,000 पौंड म्हणजेच अंदाजे 2.3 कोटी रुपये एवढी मोठी रक्कम देऊन विकत घेतलं. यावेळी तिच्या फ्रँचायझीसह काव्या मारन देखील लिलावाच्या टेबलावर उपस्थित होती, पण सनरायजर्स संघाच्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली, टीकाही झाली आणि गोंधळ माजला. या निर्णयापासूनच काव्या मारन आणि तिच्या फ्रँचायजीवर जोरदार टीका होताना दिसत असून लोका त्यांना सुनावत आहेत. 

हा वाद कमी की काय म्हणून आता या फ्रँचायझीचं सोशल मीडिया अकाउंट अचानक सस्पेंड करण्यात आलं आहे. लिलावात अबरारच्या खरेदीवरून वाद निर्माण झाल्यानंतर काही तासांतच, सनरायझर्स लीड्सचे ‘X’ अकाउंट निलंबित करण्यात आले. X च्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल अकाऊंट निलंबित करण्यात आलं आहे, असं फ्रँचायझीच्या अकाऊंटवर नमूद करण्यात आलं आहे. मात्र नेमक्या कोणत्या नियमाचे उल्लंघन झालं आणि अकाऊंट का सस्पेंड केलं हे मात्र अद्याप स्पष्ट झालेल नाही.


इतर बातम्या
Join Whatsapp Group