राम गोपाल वर्मा… बॉलिवूडमधील एक उत्तम दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख, सध्या ते अधिक कार्यरत नसले तरी एकेकाळी त्यांच्या चित्रपटांनी लोकांना वेड लावलं होतं. रंगीला, सरकार, कंपनी किंवा भूत.. एकाहून एक सरस चित्रपट देणारे दिग्दर्शक अशी त्यांची ओळख. साधारण 2 दशकांपूर्वी म्हणजे 2003 साली आलेला त्यांचा ‘भूत’ हा भयपट म्हणजे सर्वोत्तम चित्रपट होता. अजय देवगण , उर्मिला मातोंडकर, नाना पाटेकर , रेखा, फरदीन खान यांची भूमिका असलेल्या या चित्रपटाची आजही चर्चा होते. सर्वांत स्मरणीय अशा भयपटांपैकी एक असलेला हा चित्रपट आहे. रेड लॉफ्ट फिल्म फेस्टिव्हल 2026 मध्ये हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पुन्हा दाखवण्यात आला. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर, दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी चाहत्यांशी संवाद साधला आणि काही मनोरंजक गोष्टी आणि अनेक किस्से शेअर केले.
राम गोपाल वर्माने एक मोठा खुलासा केला. त्याने आपण एक्सॉर्सिस्टचे चाहते आहोत, असं सांगितलं. ते म्हणाली की, 'मी टिनेज (किशोरवयीन) असल्यापासून एक्सॉर्सिस्टचा फॅन आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर, मी अनेक दिवस झोपू शकलो नाही. मला तेव्हा स्वत:लाच नाही तर, फॅमिली मेंबर्सला पाहतानाही भीती वाटत होती , असं राम गोपाल वर्माने स्पष्ट केलं'.
भूत चित्रपटाबाबत किस्सा शेअर करताना राम गोपाल वर्मा म्हणाले, 'सुरुवातीला हा चित्रपट हवेलीत चित्रीकरण करण्याची कल्पना होती. नंतर असिस्टेंट डायरेक्टरने हा चित्रपट गोव्यातील एका ठिकाणाबाबत माहिती दिली. नंतर फिल्ममेकर्सना रिलेटेबल लोकेशन निवडण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील लोखंडवालामध्ये एक अपार्टमेंट होता. तिथे शूट करण्याचा निर्णय घेतला. ते लोकेशन प्रेक्षकांना कनेक्टेड वाटले असते', असं दिग्दर्शकाने स्पष्ट केलं.
या दरम्यान राम गोपाल वर्मा म्हणाले, “मी हा चित्रपट फक्त 30 दिवसांत पूर्ण केला, कारण मी त्याचा बहुतांश भाग एकाच अपार्टमेंटमध्ये चित्रित केला होता. पण त्याबद्दलच एक मनोरंजक गोष्ट सांगायची इच्छा आहे. 2002 साली आम्ही या चित्रपटाचं शूटिंग केलं ना, त्याला आता 20 वर्षांपेक्षा जास्त काळ उलटलाय. पण आजही तो फ्लॅट रिकामाच आहे. चित्रपट रिलीज झाल्यावर तो फ्लॅट खूप चर्चेत आला, प्रसिद्ध झाला, आणि तेव्हापासूनच कोणीही त्या फ्लॅटमध्ये रहायला धजावायचं नाही. हे घर लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये होतं,” असं राम गोपाल वर्मा यांनी सांगितलं.
भूत चित्रपटाबाबत सांगायचं झाल्यास हा सिनेमा 2003 साली प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सक्सेसफूल झाला होता. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली. हा हॉरर चित्रपट आजही प्रेक्षक आवर्जून पाहतात.