ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्‍यात
ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्‍यात
img
Dipali Ghadwaje
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार देखील उपस्थित राहणार आहे. अशातच रायगडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. 

पोलिसांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची भल्यापहाटे धरपकड सुरू केली आहे. आतापर्यंत शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शासन आपल्या दारी कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला होता. मात्र, आंदोलनापूर्वीच पोलिसांनी नोटीसा बजावत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.  

दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या परिसरात होणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला ७० ते ७५ हजार लाभार्थी आणि नागरिक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. 

यावेळी शासनाच्या विविध योजनांच्या लाभांचे वितरण केले जाणार आहे. जवळपास 25 एकर जागेत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. किल्ल्याची प्रतिकृती असलेले भव्य प्रवेशद्वार आणि व्यासपीठ असणार आहे. याच कार्यक्रमात कॅन्सर तपासणी शिबिर , कृषी आणि औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम उधळून लावू, असा इशारा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिला होता. मात्र, आंदोनापूर्वीच पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. आतापर्यंत महाड, पोलादपु, माणगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group