Asha Bhosle : बायोपिक आल्यास त्यात...  'या' दोन अभिनेत्रींची स्वत: आशा भोसले यांनी घेतली होती नावं
Asha Bhosle : बायोपिक आल्यास त्यात... 'या' दोन अभिनेत्रींची स्वत: आशा भोसले यांनी घेतली होती नावं
img
वैष्णवी सांगळे
प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रच नव्हे तर चित्रपट सृष्टीतही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आठ दशकांच्या करिअरमध्ये आशा भोसले यांनी 20 भाषांमध्ये जवळपास 12 हजार गाणी गायली. काल मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात आशा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला. निधना समयी आशा भोसले यांचं वय 92 वर्ष होतं. आशाताईंच्या निधनानंतर जगभरातून लोक वेगवेगळ्या मार्गाने आपल्या शोक भावना व्यक्त करत आहेत. 

आशा भोसले यांच्यावर चित्रपट आल्यास पडद्यावर कुठल्या अभिनेत्रीने त्यांची व्यक्तीरेखा साकारली पाहिजे?. 2018 साली आशा भोसले यांना हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर सुद्धा दिलं. डिसेंबर 2018 साली बॉम्बे टाइम्सच्या एका इंटरव्यूमध्ये लेजेंडरी सिंगर आशा भोसले यांनी आपल्या बायोपिकच्या विषयावर खूप इंटरेस्टिंग टिप्पणी केलेली. तुमच्या आयुष्यावर चित्रपट आल्यास कुठल्या अभिनेत्रीने तुमची भूमिका साकारली पाहिजे, असं तुम्हाला वाटतं? त्यावेळी आशा भोसले यांनी दोन नाव घेतली. होती. 

“मला वाटतं प्रियंका चोपडा जोनास माझा रोल पडद्यावर परफेक्ट साकारु शकते. कंगना रणौत सुद्धा चांगली अभिनेत्री आहे. मला वाटतं, ती सुद्धा माझ्या रोलसाठी शानदार निवड ठरु शकते” असं त्या म्हणाल्या होत्या. हे बोलतानाचा आशा भोसले यांनी एक मजेशीर टिप्पणी केलेली. “हे सर्व बोलल्यानंतरही मला वाटतं की, माझ्या आयुष्यावर कधी चित्रपट बनेल असं मला वाटत नाही” हे वक्तव्य त्यावेळी खूप चर्चेत राहिलेलं. कारण बॉलिवूडमध्ये त्यावेळी बायोपिक्सचा ट्रेंड जोरात सुरु होता.

आशा भोसले यांचं स्वत:च आयुष्य एका सिनेमाच्या स्टोरीसारखं आहे. गरीबीपासून सुरु होणारी ते संगीत विश्वावर राज्य करेपर्यंतची त्यांची कथा खूप रोमांचक आहे. दिग्गज गायिका बहिण लता मंगेशकर यांच्यासोबतच त्यांचं नातं, आरडी बर्मन यांच्यावर प्रेम आणि हजारो गाण्यांचा वारसा. आशा भोसले यांच्या प्रवासाला 1940 पासून सुरुवात झाली. आजही त्यांच्या आवाजाची प्रेक्षकांवरील जादू कायम आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group