पुढचा 1 महिना
पुढचा 1 महिना "या"राशींच्या अग्निपरीक्षेचा
img
दैनिक भ्रमर




नाशिक :वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 22 एप्रिल 2026 रोजी शनिचा मीन राशीत उदय झाला. शनिचा हा बदल फार महत्त्वाचा मानला जातो. कारण याचा बदल व्यक्तीच्या जीवनावर थेट होतो. कोणासाठी हा काळ प्रगतीचे नवे दरवाजे उघडण्याचा आहे. तर, काही राशींसाठी हा काळ आव्हानात्मक आणि चिंतेचा असणार आहे. विशेष म्हणजे ज्या राशींच्या लोकांवर शनिची ढैय्या आणि साडेसाती सुरु आहे. त्यांना या काळात सतर्क राहण्याची गरज आहे. त्यामुळे या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मेष रास : मेष राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. त्यामुळे हा काळ मेष राशीसाठी फार आव्हानात्मक असणार आहे. या कालावधीत तुमच्या खर्चात अचानकपणे वाढ होऊ शकते. तसेच, तुमचं मन बैचेन राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला डबल मेहनत घेण्याची गरज आहे. 

कर्क रास: कर्क राशीच्या लोकांवर सध्या शनिची ढैय्या सुरु आहे. त्यामुळे या कालावधीत तुम्हाला नशिबाची साथ मिळणार नाही. करिअरमध्ये तुमच्या अनेक अडथळे येऊ शकतात. तसेच, प्रवासाला जाण्याचे योग जुळून येणार नाहीत. त्यामुळे या काळात भरपूर मेहनत घ्या. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा. 

सिंह रास : सिंह राशीच्या लोकांवर सध्या शनिची ढैय्या सुरु आहे. हा काळ तुमच्यासाठी चढ-उताराचा असणार आहे. तसेच, अचानकपणे तुमचा मानसिक ताण वाढताना दिसेल. पैशांच्या बाबतीत तुम्हाला सावधानता बाळगण्याची गरज आहे. तसेच, नवीन कार्य हाती घेताना धैर्याने घ्या. 

वृश्चिक रास: वृश्चिक राशीच्या लोकांवर शनिची ढैय्या सुरु आहे. या काळात तुमच्या प्रेमजीवनात अनेक अडथळे येऊ शकतात. नात्यात गैरसमज वाढू शकतात. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. तरच, चांगले परिणाम मिळतील. 

कुंभ रास: कुंभ राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. या काळात तुम्हाला पैशांच्या बाबतीत सावधानता बाळगायची आहे. तसेच, खर्चावर नियंत्रण देखील ठेवावं. घरात अनावश्यक कारणाने वादविवाद किंवा तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group