वाचनातून ज्ञान, विचार आणि अनुभवांची समृद्धी वाढते; जागतिक पुस्तक दिन
वाचनातून ज्ञान, विचार आणि अनुभवांची समृद्धी वाढते; जागतिक पुस्तक दिन
img
दैनिक भ्रमर



नाशिक : संपूर्ण जगभरात 23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन आणि कॉपीराइट दिन साजरा केला जातो. या दिनाचं वैशिष्ट्य म्हणजे लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे. सध्या सोशल मीडियाच्या युगात इंटरनेटचा अधिकाधिक वापर करणारा तरूण वर्ग जरी असला तरी एखाद्या शांत ठिकाणी, एकांतात, पुस्तकांना आपला मित्र मानणाऱ्या तरूणाईची संख्या देखील कमी नाही.

या दिवशी अनेकजण व्हॉट्सअॅपवर आपल्या आवडत्या पुस्तकाचा फोटो सोशल मीडियावर स्टेट्स म्हणून टाकताना दिसतात. तर काही जण एकमेकांना पुस्तक भेट म्हणून देतात.जाणूऊन घेऊयात जागतिक पुस्तक दिनाविषयी...

23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन 

23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यामागे एक कारण आहे.  ते म्हणजे या दिवशी अनेक नामवंत लेखकांचे निधन झाले. विल्यम शेक्सपियर, मिगुएल डी सर्व्हंटिस, इंका गार्सिलोसो यांचे निधन 23 एप्रिल रोजी झाले. हा दिवस पहिल्यांदा 23 एप्रिल 1923 रोजी स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला. प्रत्येक वर्षी, UNESCO आणि आंतरराष्ट्रीय संस्था पुस्तक उद्योगातील तीन प्रमुख क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतात, ज्यामध्ये प्रकाशक, पुस्तक विक्रेते आणि ग्रंथालये यांचा समावेश होतो.

अशा पद्धतीने साजरा केला जातो हा दिवस 

प्रत्येक वर्षी जागतिक पुस्तक दिनाच्या दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. काही ठिकाणी पुस्तकांचं प्रदर्शन भरविण्यात येतं, तर काही ठिकाणी वाचनालयात एक दिवस मोफत पुस्तके वाचायला दिली जातात. काही ठिकाणी तर विनामूल्य पुस्तकांची विक्री केली जाते. तसेच आपल्या मित्र- मैत्रिणींकडून आपल्या आवडत्या पुस्तकांची देवाण-घेवाण देखील केली जाते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group