मुंबई: आजच्या काळात घरातील लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाकडे स्मार्टफोन असणे ही गरज बनली आहे. मात्र, प्रत्येक महिन्याला प्रत्येकाचा स्वतंत्र रिचार्ज करताना खिशाला मोठी कात्री लागते. ग्राहकांची हीच डोकेदुखी दूर करण्यासाठी रिलायन्स जिओने एक क्रांतिकारी फॅमिली पोस्टपेड प्लॅन आणला आहे, ज्यामध्ये मिळणारे फायदे पाहून तुम्ही थक्क व्हाल.
₹४४९ च्या प्लॅनमध्ये अवाढव्य फायदे
जिओचा ४४९ रुपयांचा प्लॅन अशा लोकांसाठी सर्वोत्तम आहे ज्यांना कमी खर्चात संपूर्ण घराचे रिचार्ज मॅनेज करायचे आहे. या प्लॅनमध्ये ७५ जीबी डेटा मिळतो, जो कुटुंबातील ४ सदस्य (१ मुख्य आणि ३ अतिरिक्त सिम) शेअर करू शकतात. प्रत्येक अतिरिक्त सिमसाठी केवळ १५० रुपये द्यावे लागतात. विशेष म्हणजे, या प्लॅनमध्ये ३ महिन्यांसाठी JioHotstar चे सबस्क्रिप्शन मिळते.
गूगल जेमिनी आणि ५०००GB क्लाउड स्टोरेजचा धमाका
या प्लॅनचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे यात मिळणारे १८ महिन्यांचे Google Gemini Pro चे सबस्क्रिप्शन, ज्याची बाजारभावाप्रमाणे किंमत तब्बल ३५,१०० रुपये आहे. इतकेच नाही तर, डिजिटल डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी जिओ ५०००GB (५ TB) चे अवाढव्य क्लाउड स्टोरेज देखील देत आहे. प्रोफेशनल काम करणाऱ्या आणि डेटा सुरक्षेला महत्त्व देणाऱ्या कुटुंबांसाठी हा प्लॅन उपयुक्त आहे.
मुव्हीज प्रेमींसाठी ₹७४९ चा प्रीमियम पर्याय
ज्या कुटुंबांना चित्रपट आणि वेब सिरीज पाहण्याची विशेष आवड आहे, त्यांच्यासाठी जिओचा ७४९ रुपयांचा फॅमिली प्लॅन उत्तम आहे. या प्लॅनमध्ये दरमहा १०० जीबी डेटा मिळतो. ४४९ रुपयांच्या प्लॅनमधील सर्व फायद्यांसह यात काही अतिरिक्त प्रीमियम ओटीटी सबस्क्रिप्शन्स देखील समाविष्ट आहेत, ज्यामुळे मनोरंजनाचा आनंद द्विगुणित होतो.
या प्लॅन्समध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा तसेच ५G फोन वापरणाऱ्यांना अमर्यादित ५G डेटाचा लाभ मिळतो. वैयक्तिक वापरासाठी जिओकडे ३४९, ६४९ आणि १५४९ रुपयांचे पर्यायही उपलब्ध आहेत. थोडक्यात, एकाच रिचार्जमध्ये पूर्ण कुटुंबाला डिजिटल युगातील सर्व प्रगत सुविधा देणारा जिओचा हा मास्टरस्ट्रोक सध्या टेलिकॉम मार्केटमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे