बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची अपडेट; मे महिन्यात 'इतके' दिवस बँकेचे कामकाज राहणार ठप्प
बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची अपडेट; मे महिन्यात 'इतके' दिवस बँकेचे कामकाज राहणार ठप्प
img
Jayshri Rajesh

मुंबई: मे महिन्यात बँकेत काम असलेल्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मे महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली असून, त्यानुसार मे महिन्यात विविध राज्यांमध्ये बँका तब्बल १२ दिवस बंद राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये राष्ट्रीय सण, प्रादेशिक सण आणि शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांचा समावेश आहे.त्यामुळे जर तुमचे बँकेत काही काम असेल तर सुट्ट्यांची यादी बघून जा.



महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे १ मे रोजी बुद्ध पौर्णिमा, कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त अनेक राज्यांत बँका बंद राहतील. १ मे रोजी शुक्रवार असल्याने सलग सुट्ट्यांचा लाँग वीकेंड ग्राहकांना मिळणार आहे.

मे मधील प्रमुख बँक सुट्ट्यांची यादी

१ मे (शुक्रवार) महाराष्ट्र दिन / कामगार दिन / बुद्ध पौर्णिमा
३ मे (रविवार) साप्ताहिक सुट्टी
९ मे (शनिवार) महिन्याचा दुसरा शनिवार / रवींद्रनाथ टागोर जयंती
१० मे (रविवार) साप्ताहिक सुट्टी
१६ मे (शनिवार) सिक्कीम राज्य स्थापना दिवस (विशिष्ट राज्यांत)
१७ मे (रविवार) साप्ताहिक सुट्टी
२३ मे (शनिवार) महिन्याचा चौथा शनिवार
२४ मे (रविवार) साप्ताहिक सुट्टी
२६ मे (मंगळवार) काझी नजरुल इस्लाम जयंती (काही राज्यांत)
२७ मे (बुधवार) बकरी ईद / ईद-उल-अधा
२८ मे (गुरुवार) बकरी ईद - दुसरा दिवस (विशिष्ट राज्यांत)
३१ मे (रविवार) साप्ताहिक सुट्टी

डिजिटल बँकिंग सेवा  राहतील सुरू

बँकेच्या शाखा बंद असल्या तरी खालील ऑनलाइन सुविधा देशभरात विनाअडथळा सुरू राहतील:
एटीएम (ATM) सेवा
मोबाईल बँकिंग आणि नेट बँकिंग
यूपीआय (UPI - Google Pay, PhonePe) द्वारे पैशांचे व्यवहार करता येतील. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group