राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का;
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का; "या" नगरपालिकेच्या नगराध्यक्षाचे जात प्रमाणपत्र अवैध
img
Jayshri Rajesh



भुसावळ : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगरपालिकेच्या राजकारणात एक मोठी आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या आणि भुसावळ पालिकेच्या नगराध्यक्षा गायत्री चेतन भंगाळे यांना मोठा दणका बसला आहे. 

जळगाव जिल्हा जात पडताळणी समितीने सखोल सुनावणीनंतर त्यांचे अनुसूचित जातीचे (SC) प्रमाणपत्र अवैध ठरवले असून यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. 

भुसावळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव होते. गायत्री भंगाळे यांनी याच राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवून दणदणीत विजय मिळवला होता. या अत्यंत चुरशीच्या लढतीत त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला होता. 

 मात्र, त्यांच्या या जात प्रमाणपत्राला पुराव्यांसह कायदेशीर आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर, जळगाव जिल्हा जात पडताळणी समितीने त्यांचे हे प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे आता गायत्री भंगाळे यांचे नगरसेवक पद आणि पर्यायाने नगराध्यक्ष पद धोक्यात आले आहे. भुसावळ पालिकेच्या राजकारणावर शरद पवार गटाचे मोठे वर्चस्व होते. मात्र, या निर्णयामुळे पक्षाला स्थानिक पातळीवर मोठा कायदेशीर आणि राजकीय धक्का बसला असून भुसावळच्या राजकीय समीकरणात मोठ्या उलटपालट होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group