२७ एप्रिलला आकाशात ग्रहांची एक विशेष स्थिती निर्माण होत असून, ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी 'धनतारिणी योग' जुळून येत आहे. हा योग आर्थिक समृद्धी आणि संकटातून मुक्ती देणारा मानला जातो. या शुभ काळामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रेंगाळलेली कामे मार्गी लागतील आणि नशिबाची भक्कम साथ मिळेल. भोलेनाथांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष रास: आडलेल्या सरकारी कामांमध्ये स्वतःहून लक्ष घालावेसे वाटेल यंत्रावर काम करणाऱ्यांनी अवश्य काळजी घ्यावी.
वृषभ रास: खूप काम करावेसे वाटले तरी प्रकृती थोडी नरम गरम राहिल्यामुळे उत्साह वाटणार नाही.
मिथुन रास: बोलण्यामध्ये एक सुरीपणा न ठेवल्यामुळे गोंधळ निर्माण होतील आपल्या निर्णयावर ठाम राहिला हवे.
कर्क रास: महिलांना वैवाहिक जीवनात जोडीदाराची तडजोड करावी लागेल.
सिंह रास: समोर उत्तम ध्येय ठेवल् तर अडचणीचे डोंगरही पार कराल.
कन्या रास: पाठीचे दुखणे डोके वर काढतील वेळीच व्यायाम आणि औषधोपचारावर भर द्यावा.
तूळ रास: हमखास यश मिळण्यासाठी कामाचे नियोजन करावे लागेल जोडीदाराचा कोणत्याही बाबतीतील थंड प्रतिसाद वादाला कारणीभूत ठरेल.
वृश्चिक रास: बौद्धिक दृष्ट्या तुम्ही कोणाला हार जाणार नाही नातेवाईकांकडून अपेक्षा भंगाचे दुःख जाणवेल.
धनु रास: महिला एखाद्या गोष्टीच्या आहारी जातील व्यवसायात एखादी गोष्ट विलंबाने झाली तरी बहुतेक कसरती करून मार्गी लावाल.
मकर रास: नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून एखादी लाभदायक घटना अनुभवायला मिळेल.
कुंभ रास: आज काम करायला अधिक उत्साह वाटेल जवळच्या नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील.
मीन रास: कोणतीही गोष्ट करताना थोडी द्विधा मनस्थिती होण्याची शक्यता आहे.