अंधश्रद्धेचा भयानक खेळ! महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत भोंदूबाबाकडून शारीरिक शोषण; दोघे अटकेत
अंधश्रद्धेचा भयानक खेळ! महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत भोंदूबाबाकडून शारीरिक शोषण; दोघे अटकेत
img
Jayshri Rajesh



अमरावती:  अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ पोलिसांनी एका ३५ वर्षीय असहाय महिलेची फसवणूक करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या दोन भोंदूंना बेड्या ठोकल्या आहेत. तुटलेले लग्न पुन्हा जुळवून देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी केवळ अंधश्रद्धेचा बाजार मांडून महिलेची लूट केली नाही, तर तिचे लैंगिक शोषणही केले.

अमरावतीच्या परतवाडा येथील अयान अहमद या नराधमाने अनेक अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याची घटना ताजी असतानाच, आता अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलेवर अत्याचार झाल्याची ही संतापजनक घटना समोर आली आहे.

अशी झाली ओळख आणि फसवणूक

या प्रकरणातील पीडित ३५ वर्षीय महिलेचे सुमारे वर्षभरापूर्वी लग्न मोडले होते. काही दिवसांपूर्वी रस्त्याने जात असताना तिची ओळख रियाजोद्दीन (वय ४५) या व्यक्तीशी झाली. पीडित महिलेने रियाजोद्दीनच्या मोबाईलवरून तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. याच संभाषणादरम्यान रियाजोद्दीनने या महिलेची असहायता आणि बिकट कौटुंबिक परिस्थिती जाणून घेतली व तिच्यावर वाईट नजर ठेवली.

'विशेष पूजे'चा बनाव अन् हजारो रुपयांची लूट

महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी रियाजोद्दीनने तिला सांगितले की, त्याचा परिचित असलेला वसीम (वय ३२) हा विशेष पूजा करण्यात पटाईत आहे. वसीम पूजा करून तिचे तुटलेले लग्न पुन्हा जुळवून देईल, असा बनाव रियाजोद्दीनने रचला. या भूलथापांना बळी पडत महिला वसीमकडे गेली. वसीमने पूजेच्या खर्चाच्या नावाखाली या गरीब महिलेकडून तब्बल २५ ते ३० हजार रुपये उकळले.

घरात शिरकाव आणि लैंगिक अत्याचार

पैशांची लूट केल्यानंतरही आरोपींचा हाव सुटला नाही. रियाजोद्दीनने या दरम्यानच्या काळात पीडित महिलेच्या घरी वारंवार येणे-जाणे वाढवले. महिलेच्या एकटेपणाचा आणि असहायतेचा फायदा घेत या भोंदूने तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केले.

पोलिसांकडून दोन्ही आरोपींना बेड्या

स्वतःची फसवणूक आणि छळ झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने अखेर हिंमत करून पोलीस ठाणे गाठले. तिच्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करत तात्काळ कारवाई केली. पोलिसांनी मुख्य सूत्रधार रियाजोद्दीन आणि त्याचा साथीदार वसीम या दोघांनाही अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group