१४ लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार! महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल नेमका कधी लागणार? मोठी अपडेट समोर!
१४ लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार! महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल नेमका कधी लागणार? मोठी अपडेट समोर!
img
Jayshri Rajesh
पुणे: फेब्रुवारी-मार्च २०२६ या कालावधीत बारावीची परीक्षा दिलेल्या राज्यातील १४ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (MSBSHSE) बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.



काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'डिजीलॉकर' (DigiLocker) च्या अधिकृत पोर्टलवर बारावीच्या निकालाशी संबंधित 'HSC Result Coming Soon' चा मेसेज झळकू लागला आहे. त्यामुळे निकाल प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून कोणत्याही क्षणी निकाल जाहीर होऊ शकतो. यापूर्वी हा निकाल १३ मे ते २५ मे च्या दरम्यान लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

निकाल कसा आणि कुठे पाहायचा?

महाराष्ट्र बोर्डाकडून बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर (Seat Number) आणि आईचे नाव सोबत ठेवावे लागेल. निकाल खालील वेबसाईटवर उपलब्ध असेल:

१. mahresult.nic.in
२. hscresult.mkcl.org
३. mahahsscboard.in
४. results.digilocker.gov.in
इतर बातम्या
Join Whatsapp Group