२ मे २०२६
ज्योतिष शास्त्रानुसार, मे महिन्याचा पहिला आठवडा लवकरच सुरू होतोय. हा नवीन आठवडा ज्योतिषशास्त्रानुसार, 4 ते 10 मे पर्यंत असणार आहे. या आठवड्यात काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर काहींना आर्थिक फटका बसणार आहे. या आठवड्यात अनेक मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच, अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत.
तूळ रास -
तूळ राशीच्या लोकांसाठी मे महिन्याचा पहिला आठवडा यशाचा आणि समृद्धीचा असणार आहे. तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुम्हाला यश मिळेल. तसेच, काही लोकांबरोबर तुमचे वैचारिक मतभेद होऊ शकतात. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढेल. तसेच, नकारात्मक गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा
वृश्चिक रास -
वृश्चिक राशीसाठी मे चा आठवडा आर्थिक भरभराटीचा असणार आहे. या काळात तुम्हाला तुमची नुकसान भरपाई मिळू शकेल. तसेच, मन थोडं बैचेन असेल. अशा वेळी तुमच्या आवडीची गाणी ऐका. छान पुस्तक वाचा. मन रमवण्याचा प्रयत्न करा. तसेच, पैशांचा जपून वापर करा.
धनु रास -
धनु राशीसाठी नवीन आठवडा आनंददायी असणार आहे. या काळात तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, हातात घेतलेल्या कार्यात यश मिळेल. तुमच्या आजूबाजूला सकारात्मक गोष्टी घडताना दिसतील. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी मोलाचं ठरेल.
मकर रास
मकर राशीसाठी मेचा पहिला आठवडा सामान्य असणार आहे. या कालावधीत तुम्हाला ना लाभ ना तोटा होईल. त्यामुळे नोकरीत प्रमोशनबाबत शब्द टाका. तुमच्या कामाला कमी लेखू नका. तसेच, धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. जर तुम्हाला नवीन वाहनाची खरेदी करायची असेल तर त्यासाठी हा काळ योग्य नाही.
कुंभ रास
कुंभ राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या काळात अनेक शुभ योग जुळून येणार आहेत. दिवसभरात तुम्हाला शुभवार्ता मिळू शकते. तसेच, धनलाभाचे योग जुळून येमार आहेत. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो.
मीन रास
मीन राशीसाठी नवीन आठवडा भाग्यशाली असणार आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील. तसेच, जर तुम्ही नोकरी बदलीचा विचार करणार असाल तर तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरेल.
Copyright ©2026 Bhramar