निदा खान प्रकरणात MIM नगरसेवकावर पहिली मोठी कारवाई !
निदा खान प्रकरणात MIM नगरसेवकावर पहिली मोठी कारवाई !
img
Nandini khandare More


नाशिकमधील प्रसिद्ध आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे . मुख्य आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर पहिली मोठी कारवाई करण्यात आली आहे. एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या अनधिकृत बांधकामावर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने अखेर बुलडोझर चालवला आहे. विशेष म्हणजे, ज्या घरात निदा खानला आश्रय देण्यात आला होता, ते घरही महानगरपालिकेकडून  जमीनदोस्त करण्यात येणार आहे. 

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने मतीन पटेल यांना अनधिकृत बांधकामाप्रकरणी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ४७८ (२) अन्वये नोटीस बजावली होती. या नोटिसीनुसार, २४ तासांच्या आत संबंधित अवैध बांधकाम स्वतःहून हटवण्याचे आदेश देण्यात आले होते. मतीन पटेल यांनी यावर खुलासा सादर करत मुदतवाढीची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने त्यांचे कागदपत्रे आणि स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याचे ठरवत कारवाईचा निर्णय घेतला.

 त्यामुळे आज पहाटे महापालिकेचे पथक बुलडोझरसह मतीन पटेल यांच्या घरावर धडकले. यावेळी कारवाईची शक्यता पाहून मतीन पटेल यांनी स्वतःहून काही अतिक्रमण काढून घेण्यास सुरुवात केली होती. या कारवाईचे दुसरे महत्त्वाचे पाऊल म्हणजे निदा खानला ज्या घरात लपवण्यात आले होते आणि तिला आश्रय मिळाला होता, त्या ठिकाणचा आढावा मनपा प्रशासनाने घेतला आहे. मतीन पटेल यांच्यावरील कारवाईनंतर लगेचच हे घर देखील महानगरपालिकेकडून जमीनदोस्त केले जाणार असल्याचे बोललं जात आहे.




इतर बातम्या
Join Whatsapp Group