दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या बहुप्रतीक्षित ‘जेलर 2’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान चेन्नईतील एका खासगी स्टुडिओमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. आर्ट डिपार्टमेंटमध्ये काम करणारे कार्तिकेयन हे सेट उभारणीचे काम करत असताना अचानक विजेचा प्रवाह सुरू झाल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. सहकाऱ्यांनी तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर कनाथुर पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला असून सेटवर विजेचा लीक कसा झाला आणि सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याचा सखोल तपास केला जात आहे.