आधी पेट्रोल, डिझेल,नंतर CNG मध्ये दर वाढ झाल्याने सामन्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. दरम्यान आता LPG सिलेंडरच्या किंमतीत पण वाढ होते की काय असा पप्रश्न सामन्यांना पडला आहे. दरम्यान , मिळालेल्या माहितीनुसार सध्या LPG सिलेंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. आज 26 मे रोजी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
दिल्लीत 14.2 किलोग्रॅम घरगुती सिलेंडरचा भाव 913 रुपये, मुंबईत हाच दर 912.50 रुपये, कोलकत्तामध्ये 939 रुपये असा भाव आहे. चेन्नईमध्ये घरगुती सिलेंडरचा भाव 928.50 रुपये इतका आहे. किंमती मार्च महिन्यापूसन स्थिर आहे. मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 60 रुपयांची वाढ झाली होती. पण गेल्या 12 वर्षांचा विचार केला. तर घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती दुप्पट झाल्या आहेत. गेल्या एका तपात पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजीची भयावह दरवाढ झाली आहे. सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा पडला आहे.
दरम्यान , व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती अमेरिका-इराण-इस्त्रायल युद्धानंतर 47 टक्क्यांनी भडकल्या आहेत. यापूर्वी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती 900 रुपयांहून अधिकने भडकल्या आहेत. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मार्च महिन्यात 60 रुपयांची वाढ झाली होती. अद्याप त्यात वाढ झालेली नाही. पण इंधन दरवाढ पाहता, घरगुती गॅसची किंमत अजून किती दिवस आटोक्यात राहिल याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.