नाशिकमधील TCS प्रकरणाने देशभरात खळबळ निर्माण केली असून या प्रकरणात नवनवीन खुलासे होत असून आता या प्रकरणाला नसून वळण मिळणार आहे. कारण आता या प्रकरणात फॉरेन्सिक टीमची एन्ट्री झाली आहे. आता या प्रकरणात आता आणखी काय काय खुलासे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार , धर्मांतरण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला लपवून ठेवण्याच्या प्रकरणातील एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावरही गुन्हा दाखल झाला. महत्त्वाची बाब म्हणजे पोलिसांना या प्रकरणात मतीन पटेल आणि निदा या दोघांमध्ये फोनवरून तसेच चॅटद्वारे संवाद झाल्याचं समोर आलं आहे. या दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं हे जाणून घेण्यासाठी आता फॉरेन्सिक टीमकडे मतीन पटेलचा फोन पाठवला जाणार आहे.
या प्रकरणात पोलिस यंत्रणा सखोल तपास करत असून अनेकांना रडारवर घेतलं जात आहे. मतीन पटेल याला पोलिसांनी नोटीस देत काल चौकशीसाठी बोलावले होते. विशेष पोलिस पथकासमोर मतीन यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यांच्या सोबत त्यांचे वकील ॲड. अभयसिंग भोसले देखील हजर होते. सूत्रांच्या माहितीनुसार, यावेळी मतीन पटेल याने, ‘महिला मदत मागायला आली, त्यामुळे नगरसेवक म्हणून मी मदत केली,’ असं सांगितलं.