बॉलीवूड लोकप्रिय अभिनेता नुकताच एका वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. फरहान अख्तरच्या ‘डॉन 3’ या चित्रपटातून शूटिंगच्या अवघ्या काही दिवस आधी माघार घेतल्याने अभिनेता रणवीर सिंह मोठ्या वादात सापडला आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (FWICE) रणवीरवर थेट बंदी घातली आहे. याचदरम्यान आता रणवीर रणवीर सिंह थेटर म्हैसूरच्या चामुंडेश्वरी मंदिरात दर्शनासाठी गेल्याचे कळतेय.
चित्रपटसृष्टीतील इतर कलाकारांना त्याच्यासोबत काम करू नये असे निर्देश देण्यात आला आहे. या मोठ्या निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी मंगळवारी सकाळी रणवीर म्हैसूरच्या चामुंडेश्वरी मंदिरात प्रार्थनेसाठी पोहोचला. या मंदिरातील त्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रणवीरची चामुंडेश्वरी मंदिरातील ही भेट ‘कांतारा’ चित्रपटातील देवीची नक्कल केल्याच्या प्रकरणाशी संबंधित आहे.
गोवा सरकारद्वारे आयोजित 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रणवीरने ‘कांतारा : चाप्टर 1’च्या क्लायमॅक्समध्ये दाखवलेल्या चावुंडी देवीचा अपमान केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं होतं आणि कोर्टात रणवीरला बिनशर्त माफी मागावी लागली होती. त्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रणवीरने आता मंदिरालाही भेट दिली आहे. न्यायालयाने चार आठवड्यांच्या आत रणवीरला चामुंडेश्वरी मंदिरात जाऊन प्रार्थना करण्याचा आदेश दिला होता.