राज्यात सध्या विधपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर महायुतीतील हालचालींना वेग आला असून आधीच जागावाटपावरून महायुतीत तिढा निर्माण झालं होता. दरम्यान आता या जागेंवर उमेदवाराचे नावं फायनल झाले असून आता मात्र महायुतीला मोठा झटका बसला असल्याची बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , महायुतीतील अनेक नेत्यांनी आपल्या पक्षाचा आदेश झुगारून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
महायुतीमध्ये कुठे कुठे बंडखोरी?
1)रायगडमध्ये राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरेंना उमेदवारी,महेंद्र दळवींची मुलगी जुईली दळवींची बंडखोरी
2)संभाजीनगर-जालना-भाजपकडून सुहास शिरसाठ यांना उमेदवारी,आ.अब्दुल सत्तार यांचे पुत्र समिर सत्तारांची बंडखोरी
3)यवतमाळ-शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदींना उमेदवारी,तर भाजपचे नितिन भुतडा, राष्ट्रवादीकडून साजिद बेग यांची बंडखोरी
4)पुण्यात राष्ट्रवादीकडून विक्रम काकडेंना उमेदवारी,भाजपचे प्रदिप कंद यांच्याकडून बंडखोरी
5)अमरावतीत भाजपकडून प्रविण पोटेंना उमेदवारी,शिवसेनेचे विप्लव बाजोरीयांची बंडखोरी
6)नाशिक -शिवसेनेकडून नरेंद्र दराडेंना उमेदवारी,अपक्ष गोकूळ गिते,गणेश गितेंचा अर्ज,महाजनांचे निकटवर्तीय
7)परभणी-शिवसेनेकडून सईदा खान यांना उमेदवारी,राष्ट्रवादीकडून विजय जामकर आणि जिल्हा परिषद सदस्य संग्राम जामकरांची बंडखोरी
8)नांदेड-भाजपकडून अमरनाथ राजूरकरांना उमेदवारी,राष्ट्रवादीचे प्रविण पाटील चिखलीकरांची बंडखोरी (आमदार चिखलीकरांचा मुलगा)