शिंदेंसमोर नाशिकचा पेच !  दादा भुसे, उदय सामंत अ‍ॅक्शन मोडमध्ये
शिंदेंसमोर नाशिकचा पेच ! दादा भुसे, उदय सामंत अ‍ॅक्शन मोडमध्ये
img
Nandini khandare More

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकरण चांगलेच रंगले असून महायुतीमध्ये मोठे नाट्यमय वातावरण आहे.याच  दरम्यान आता एक अपडेट समोर आलीय. काही जागांवर बंडखोर अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम असल्यानं महायुतीचं टेन्शन वाढलं आहे.   नाशिक विधान परिषदेसाठी सुरुवातीला भाजपच्या गणेश गीतेंकडून अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या महायुतीच्या बैठकीत नाशिकची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. शिवसेनेकडून नरेंद्र दराडेंनी त्यांचा अधिकृत अर्ज दाखल केला. दुसरीकडे राष्ट्रवादीकडूनही बंडखोरी करत विष्णुपंत म्हैसधुने, गोरख बोडके यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अगदी शेवटच्या क्षणी गोकुळे गीते यांनी देखील आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.

शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी गणेश गीते आणि गोकुळ गीते यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र गीते बंधू शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यांच्या संपर्कात नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र दुसरीकडे गोरख बोडके यांनी मंत्री दादा भुसे आणि उदय सामंत यांची भेट घेऊन निवडणुकीतून माघार घेण्याबाबत चर्चा केली. या भेटीनंतर बंडखोर लवकरच माघार घेतील अशी अशा उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात आलेले नाहीये. त्यामुळे आता त्यांचे नगरसेवक कोणाला मतदान करणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group