पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील विषारी दारू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणात अवघ्या आठवड्याभरात 22 जणांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान आता या संदर्भात एक मोठी अपडेट आली आहे मिळालेल्या माहितीनुसार , या प्रकरणात झालेल्या मृत्यूंनंतर पोलिसांच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना आता पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील अधिकाऱ्यांवरही मोठी कारवाई करण्यात आली आहे.या प्रकरणाील आरोपी गुरुमंगलसिंग कर्नलसिंग विरका याच्या घरावर बुलडोझर चालणार आहे.
पिंपरी चिंचवड विषारी दारू कांडातील दारू विक्रेता आरोपी गुरुमंगलसिंग कर्नलसिंग विरकाच्या घरावर बुलडोझर चालणार आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली आहे. आरोपीच्या घरावर कारवाईची नोटीस लावण्यात आली आहे. आरोपी विरकाचे घर अनधिकृत असल्याचं सांगत नोटीस देण्यात आली आहे.