सोन्याच्या दरात मोठी  घसरण; आज 10 ग्रॅमचा भाव पाहून खरेदीदार खुश
सोन्याच्या दरात मोठी घसरण; आज 10 ग्रॅमचा भाव पाहून खरेदीदार खुश
img
Nandini khandare More

जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर कमी जास्त होत असतानाच आता मात्र ग्राहकांसाठी एक मोठी खुशखबर आहे. कारण आता पुन्हा एकदा सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.आज म्हणजेच  गुरूवार, 4 जूनच्या सकाळी, राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,56,630 रुपयांपर्यंत खाली घसरला. तर मुंबईत हाच भाव प्रति 10 ग्रॅम 1,56, 210 रुपये इतका आहे. 

जागतिक बाजारात सोन्याच्या दरातील कमजोरी आणि अमेरिका-इराण शस्त्रसंधी कराराबाबतच्या अनिश्चिततेमुळे भारतातही या मौल्यवान धातूच्या दरात घट झाली आहे. ग्राहकांसाठी ही एक खुशखबरच आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे प्रमुख व्याजदर दीर्घकाळ वाढलेले राहतील अशी भीती निर्माण झाली आहे, ज्याचा परिणाम मौल्यवान धातूंवर झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचा भाव प्रति औंस 4,463.84 डॉलर्स इतका आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची जून महिन्याची बैठक, काल म्हणजे 3 जून रोजी सुरू झाली. या बैठकीतले निर्ण, उद्या, 5 जून रोजी जाहीर केले जातील. दे शाचा रेपो दर सध्या 5.25 टक्के आहे, जो एप्रिलच्या बैठकीत बदलण्यात आला नव्हता. सध्या पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे महागाई आणि आर्थिक वाढीस निर्माण झालेली आव्हाने पाहता, मध्यवर्ती बँक या वेळीही रेपो दर 5.25 टक्क्यांवर स्थिर ठेवू शकते, अशी चर्चा आहे.

दरम्यान एक दिवसापूर्वीच, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सोन्याच्या विक्रीचे वृत्त फेटाळून लावले. प्रत्यक्ष सोन्याचा साठा 880.52 २ टन इतका स्थिर आहे, असं बँकेने सांगितलं. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाच्या परिणामापासून आपल्या परकीय चलन साठ्याचे संरक्षण करण्यासाठी मध्यवर्ती बँकेने अंदाजे 12 अब्ज डॉलर किमतीचे सोने विकल्याचे वृत्त होतं. आरबीआयने यावर स्पष्टीकरण जारी केलं. 22 मे 2026 पर्यंत भारताच्या परकीय चलन साठ्यात सोन्याचा वाटा 16.85 टक्के होता.

दरम्यान , सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही घसरण सुरूच आहे. 4 जूनच्या सकाळी चांदीचा भाव 2,79,900 रुपये प्रति किलोग्राम होता. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट चांदीचा भाव 74.43 डॉलर प्रति औंस होता. या वर्षी जानेवारीमध्ये चांदीच्या देशांतर्गत भावाने 4 लाख रुपये प्रति किलोग्रामचा टप्पा ओलांडला होता. मात्र आता चांदी 3 लाखांच्या खाली आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group