बारावी पास तोतया डॉक्टरकडून हजारो महिलांचे गर्भलिंग निदान !  तपासात धक्कादायक खुलासे
बारावी पास तोतया डॉक्टरकडून हजारो महिलांचे गर्भलिंग निदान ! तपासात धक्कादायक खुलासे
img
Nandini khandare More

एका  बारावी पास तोतया डॉक्टरकडून हजारो महिलांचे गर्भलिंग निदान केली असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील यवत परिसरातील  तोतया डॉक्टरने गेल्या अडीच वर्षांत हजाराहून अधिक महिलांचे गर्भलिंगनिदान केल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रॅकेटची व्याप्ती पुण्यासह सातारा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतही पसरली आहे. ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक केली आहे.

गर्भलिंग निदानाच्या बेकायदेशीर रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याचे तपासातून समोर आले आहे. मागील अडीच वर्षांत हजारो महिलांचे गर्भलिंग निदान करून बहुसंख्य गर्भपात करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे

या रॅकेटची पाळेमुळे पुण्यासह अन्य तीन ते चार जिल्ह्यांपर्यंत पोहोचल्याचा संशय पोलिसांना आहे. पुणे ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली.

याप्रकरणी दोघांना अटक केली असून, डॉक्टरांसह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्या शोधार्थ पोलिस पथक रवाना करण्यात आले आहे. आण्णासाहेब गिरी डॉक्टर अतुल अंकुश जाधव याला अटक करण्यात आली असून यासह नरेंद्र साहेबराव ठाकरे, मंदार सुरेश माळी ,आणि सुंदरम कदम  यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 याप्रकरणी यवत पोलिसांनी केडगाव परिसरात गर्भलिंग निदान प्रकरणात कारवाई करत मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. फिर्यादी डॉ. सचिन विठ्ठल गुजर यांना १७ मे रोजी एकाने महिलेचे गर्भलिंग निदान करत असल्याचा व्हिडीओ पाठवला होता. या व्हिडीओच्या आधारे यवत पोलिस ठाण्यात त्यांनी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान आरोपी आण्णासाहेब गिरी याने नरेंद्र ठाकरे याच्याकडून सोनोग्राफी मशीन घेतल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान , मुख्य आरोपी गिरी याला अटक केल्यानंतर गुन्ह्यात अतुल जाधव, नरेंद्र ठाकरे, मंदार माळी,सुंदरम कदम यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. तसेच जप्त केलेल्या व्हिडीओंची पडताळणी केल्यानंतर आरोपी आण्णासाहेब गिरी स्वतः गर्भलिंग निदान करत असल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. आरोपींच्या बँक खात्यांचे व्यवहार, मोबाइल सीडीआर आणि इतर तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण सुरू आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण देशमुख यांनी केली.

आरोपी अण्णासाहेब गिरी हा बारावी पास असून त्याने बी.फार्मसी.साठी प्रवेश घेतला होता. मात्र, ते शिक्षण त्याने पूर्ण केले नाही. त्यानंतर एका आयुर्वेदिक औषधांचा एमआर म्हणून काम करायचा. या सगळ्या अनुभवाच्या जोरावर आरोपीने महिलांची अवैधरीत्या गर्भलिंग निदानाची तपासणी सुरू केली. गिरीने आणखी दोन जिल्ह्यांत अशाच प्रकारे बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान तपासणी केली आहे. त्याअनुषंगाने तपास केला जात आहे.


पोर्टेबल मशीन आणि गर्भपाताचे कनेक्शन

तपासात गिरी याने अडीच वर्षांपूर्वी पोर्टेबल सोनोग्राफी मशीन नरेंद्र ठाकरे याच्याकडून घेतल्याचे उघड झाले आहे. तसेच गर्भलिंग निदानानंतर काही महिलांना गर्भपातासाठी वाघोलीतील डॉ. अतुल जाधव यांच्या दवाखान्यात पाठवले जात असल्याची माहितीसमोर आली आहे. आरोपी गिरी हा गावोगावी जाऊन महिलांची गर्भलिंग निदानाची तपासणी करत होता. त्यासाठी प्रत्येकी साधारणपणे ४० ते ६० हजार तो फीस घेत होता. त्यासोबतच घरची परिस्थिती उत्तम असल्यास त्याची रक्कम देखील तो वाढवत होता, असे तपासात निष्पन्न झाले आहे.जिल्ह्यातील केडगाव परिसरात गर्भलिंग निदान करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असून, तांत्रिक तपासात आरोपी हा १२ ते १५ डॉक्टरांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group