गुड न्यूज ! मान्सूनची मोठी अपडेट, आता धो -धो कोसळणार
गुड न्यूज ! मान्सूनची मोठी अपडेट, आता धो -धो कोसळणार
img
Nandini khandare More


मान्सूनची आतुरतेने  वाट पाहणाऱ्या सर्वांसाठी एक गुड न्यूज आहे. आता मान्सून लवकरच आगमन करून धो- धो बरसणार असल्याची अपडेट समोर आली आहे. 
पुढील दोन दिवसांत महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. केरळपासून गोवा आणि मुंबईपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर पाऊस पडण्याची शक्यता आहे. कर्नाटक आणि केरळमधील काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळू शकतो. 6 जून रोजी कोकण ते विदर्भ 25 जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. .

तर ईशान्य भारतातही पावसाचा जोर झपाट्याने वाढेल. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मान्सून लवकरच संपूर्ण ईशान्य प्रदेश व्यापेल.

उत्तर भारतातील सक्रिय पश्चिमी वाऱ्यांमुळे 6 जून रोजी जम्मू आणि काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानच्या अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याचा वाराही वाहू शकतो. मात्र, 7 जून नंतर उत्तर भारतातील पावसाची तीव्रता कमी होण्याचे संकेत आहेत.

मध्य प्रदेशच्या अनेक भागांमध्ये हवामान बदलणार आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेर, जबलपूर आणि आसपासच्या परिसरातील तापमान कमी होऊ शकते. दुसरीकडे, बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये सध्या तरी सर्वदूर पावसाची शक्यता कमी आहे. 6 जूनपासून बिहारच्या उत्तर आणि तराई प्रदेशात पावसाचे प्रमाण वाढू शकते, तर दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये हवामान उबदार राहू शकते.

हवामान तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, दक्षिण आणि पश्चिम भारतात मान्सूनची प्रगती अनुकूल आहे. येत्या काही दिवसांत मान्सून गोवा, उर्वरित कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि ईशान्य भारतातील अधिक भागांमध्ये पुढे सरकण्याची शक्यता आहे. उत्तर भारताला मान्सूनसाठी आणखी थोडा वेळ थांबावे लागेल, परंतु मान्सूनपूर्व पावसामुळे उष्णतेपासून दिलासा मिळत राहील.
इतर बातम्या
Join Whatsapp Group