तमिळनाडूतीळ राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत असून आता एक मोठी बातमी समोर आली आहे. तमिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी राजीनामा दिला असून त्यांच्या पाठोपाठ 1पदाधिकाऱ्यांसह अनेकांची राजीनाम्यांची मालिका सुरु झाली आहे. दरम्यान हा तामिळनाडूत भाजपाला बसलेला हादराच मानला जात आहे.
भाजपचे तमिळनाडू उपाध्यक्ष करू नागराजन आणि राज्य सचिव सुमती व्यंकटेश यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याशिवाय आणखी किमान 15 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा सादर केल्याची माहिती समोर आली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अण्णामलाई यांच्या नेतृत्व बदलानंतर पक्षातील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर येऊ लागले आहेत. अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्षाच्या निर्णयांवर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडींमुळे तमिळनाडूमध्ये भाजपसमोर मोठे संघटनात्मक आव्हान निर्माण झाले असून आगामी निवडणुकांपूर्वी पक्षाची चिंता वाढली आहे.