LPG दरात ''इतक्या'' रुपयांची कपात, तरी ऑटोचालक नाराज !
LPG दरात ''इतक्या'' रुपयांची कपात, तरी ऑटोचालक नाराज !
img
Nandini khandare More
काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणाव आणि आखाती भागातील संघर्षामुळे एलपीजीच्या दरात मोठी वाढ झाली होती. दरम्यान,  आता ऑटो एलपीजीच्या दरात 5 रुपयांनी कपात करण्यात आली असून, त्यामुळे इंधन खर्चाचा काहीसा भार कमी होणार आहे. नव्या दरांनुसार ऑटो एलपीजीची किंमत प्रतिकिलो 99 रुपयांवरून 95 रुपयांपर्यंत खाली आली आहे. 
 
नागपूरमध्ये ऑटो एलपीजीचे दर 100 रुपयांच्या पुढे गेले होते. मात्र जागतिक बाजारातील परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर दरांमध्ये घट होण्यास सुरुवात झाली असून, सध्या एलपीजीचे दर 94 ते 95 रुपयांच्या आसपास आले आहेत.

या दरकपातीमुळे नागपूरमधील हजारो ऑटो रिक्षाचालकांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळाला आहे. वाढत्या इंधन खर्चामुळे गेल्या काही महिन्यांपासून चालकांवर अतिरिक्त आर्थिक ताण निर्माण झाला होता. त्यामुळे दर कमी झाल्याने वाहन चालवण्याचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.

तथापि, ऑटो चालक संघटनांनी ही कपात अपुरी असल्याचे मत व्यक्त केले आहे. एलपीजीचे दर पूर्वी ज्या पातळीवर होते, त्याच दरात इंधन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी चालकांकडून करण्यात येत आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर इंधन दरांमध्ये आणखी कपात होण्याची अपेक्षा चालकांनी व्यक्त केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group